Poultry Farming Success : भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेतीवर आधारित आहे. मात्र असे असले तरी अजूनही भारतीय शेतकऱ्यांना शेती करताना नानाविध अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे. कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी बाजारात शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी फारसे असे उत्पन्न मिळत नाहीये.
अशातच मात्र दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातुन एका तरुण शेतकऱ्याचा प्रयोग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. जालना तालुक्यातील अहंकार देऊळगाव येथील एका तरुण शेतकऱ्याने शेतीसोबतच कुकुटपालन या शेतीपूरक व्यवसायातून लाखोंची कमाई करून दाखवली आहे.
सुरुवातीला या तरुण परीक्षण शेतकऱ्याने 500 कोंबड्यांच्या पिल्लांपासून कुकूटपालन व्यवसाय सुरू केला आजच्या घडीला हा व्यवसाय 4000 पक्षांचा बनला आहे. ज्यातून हा शेतकरी महिन्याकाठी एक लाख रुपये कमवत आहे. अहंकार देऊळगाव येथील राहुल गंडाळ या तरुणाने ही किमया साधली आहे. यामुळे सध्याची या शेतकऱ्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
खरं पाहता राहुल यांच्याकडे वडिलोपार्जित पाच एकर शेतजमीन आहे. मात्र शेतीतुन पारंपारिक पीक पद्धतीतं अतिशय कवडीमोल असं उत्पन्न त्यांना मिळत होत. यामुळे त्यांनी शेतीला जोडव्यवसाय म्हणून सर्वप्रथम शेळीपालन करण्याचा निर्णय घेतला. मात्र शेळी पालन व्यवसायात त्यांना मोठ अपयश आलं. मग काय निश्चयाचा महामेरू राहुल खचला नाही त्यांनी अपयश पचवत दुग्ध व्यवसाय सुरू केला.
यामध्ये देखील त्यांना मोठा लॉस झाला. परिणामी मग त्यांनी कुक्कुटपालन व्यवसायात उतरण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी सर्वप्रथम कुकूटपालन व्यवसाय करणारे शेतकरी व व्यावसायिक यांच्याकडून सर्व बारकावे शिकून घेतले. त्यानंतर 500 कोंबड्यांचे संगोपन करत कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला. यामध्ये त्यांना यश आले.
या व्यवसायासाठी त्यांनी तीन गुंठ्यात दोन शेड म्हणजेच पोल्ट्री फार्म उभारले. सद्यस्थितीला या व्यवसायात त्यांना चांगली कमाई होत असून त्यांच्या पोल्ट्री फार्म मध्ये आता 4000 कोंबड्यांचे संगोपन होत आहे. खरं पाहता कोरोना काळात मोठमोठे उद्योगधंदे बंद पडले.
विशेष म्हणजे पोल्ट्री उद्योगाला देखील कोरोनाचा फटका बसला. मात्र राहुल गंडाळ यांचा व्यवसाय त्या काळात भरभराटीसं आला. कोरोना काळात राहुल यांना या व्यवसायातून चांगली कमाई झाली. राहुल यांच्या मते या व्यवसायात अधिक लेबर ची आवश्यकता लागत नाही.
एकटा माणूस 5000 पक्षांचे पोल्ट्री फार्म सहज सांभाळू शकतो. ते स्वतः चार हजार पक्षांचे पोल्ट्री फार्म व्यवस्थित रित्या सांभाळत असून महिन्याकाठी एक लाखांची कमाई करत आहेत. मात्र असे असले तरी पक्षी टाकल्यापासून सुरुवातीचे आठ दिवस पक्षांची विशेष काळजी घ्यावी लागते.
सुरुवातीला व्यवस्थित लक्ष घातले तर निश्चितच यातून चांगली कमाई करणे शक्य असल्याचे राहुल यांनी सांगितले. एकंदरीत राहुल यांनी शेतीसोबतच कुक्कुटपालन हा व्यवसाय करून इतरांसाठी मार्गदर्शक असं काम केलं आहे.