Poultry Farming Tips : कुक्कुटपालनात कमी खर्चात कमवायचे लाखो तर पाळा कोंबडीची ‘ही’ जात! अंडी व मांस उत्पादनासाठी आहे प्रसिद्ध

Tejas B Shelar
Published:

Poultry Farming:- शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन, शेळीपालन यासारखे व्यवसाय पूर्वापार चालत आलेले आहेत. काळाच्या ओघात यासोबतच आता कुक्कुटपालन, मत्स्यपालन, बटेर पालन, ससेपालन, वराह पालन, खेकडा पालन इत्यादी प्रकारचे जोडधंदे शेतकरी करू लागले आहेत. ज्याप्रमाणे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले अगदी त्याचप्रमाणे जोडधंदांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा शिरकाव झाल्यामुळे अगदी व्यवस्थित दृष्टिकोनातून आता शेतीपूरक व्यवसाय शेतकरी करू लागले आहेत.

यामध्ये जर आपण कुक्कुटपालन व्यवसायाचा विचार केला तर अगोदर घरापुढील अंगणात म्हणजेच परस बागेपुरता मर्यादित असलेला हा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दृष्टिकोनातून केला जातो. कुक्कुटपालनामध्ये देखील अनेक कोंबड्यांच्या जाती विकसित करण्यात आलेल्या असून या विकसित जातींची अंडी व मांस उत्पादन क्षमता जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच आता हा व्यवसाय परवडण्यासारखा झालेला आहे.

कुक्कुटपालन व्यवसायामध्ये जर जातिवंत आणि दर्जेदार जातींचे पालन केले तर नक्की शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. याच दृष्टिकोनातून आता नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणच्या आदिवासी भागातील शेतकऱ्यांची उत्पन्न वाढावे याकरिता त्यांना ऑस्ट्रेलियन वंशाच्या ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प या सुधारित कोंबड्या पाळून त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नेमकी या कोंबडीच्या जातीचे नेमके काय वैशिष्ट्ये आहेत? याविषयी या लेखात माहिती घेऊ.

ऑस्ट्रेलियन वंशाची ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प आहे मांस व अंडी उत्पादनासाठी फायदेशीर

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील जे काही शेतकरी आहेत त्यांना परस बागेमध्ये कुक्कुटपालन करून आर्थिक उत्पन्न मिळावे या दृष्टिकोनातून त्यांना ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प ही कोंबडीची सुधारित जात पालनासाठी दिली जात असून या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे हा त्यामागचा दृष्टिकोन आहे.

एवढेच नाही तर नाशिकच्या कृषी विज्ञान केंद्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून या जातीच्या कोंबडी पालनाचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण तसेच मार्गदर्शन देखील दिले जात आहे. जर आपण देशी कोंबडीचा विचार केला तर साधारणपणे ती एका वर्षाला 50 ते 70 अंडी देते व या कोंबडीचे एक किलो वजन पूर्ण होण्यासाठी जवळजवळ सात ते आठ महिन्यांचा कालावधी लागतो.

साहजिकच जितका जास्त कालावधी लागेल तितकाच त्यासाठी खर्च देखील शेतकऱ्यांना जास्त करावा लागतो. परंतु या या पारंपारिक गावठी कोंबडीच्या तुलनेमध्ये जर आपण ब्लॅक ओस्ट्रोलॉर्प जातीच्या कोंबडीचा विचार केला ही कोंबडी वर्षाला 120 ते 140 अंडी देते व अडीच ते तीन महिन्यातच तिचे वजन सव्वा किलो पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त देखील होते.

त्यामुळे शेतकऱ्यांना अगदी कमीत कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न मिळते. या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून या जाती शिवाय गिरीराज तसेच वनराज इत्यादी सुधारित गावठी कोंबडी पालना विषयीचे प्रात्यक्षिक प्रकल्प राबविण्यात येत असून

या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. साधारणपणे 2007 पासून नाशिक जिल्ह्यातील 109 गावांमधील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून कुक्कुटपालनाचे मार्गदर्शन घेतले व आपल्या आर्थिक उत्पन्नात वाढ करून जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे.

ब्लॅक ओस्ट्रॉलोर्प कोंबडीच्या जातीचे वैशिष्ट्ये

1- ही कोंबडी काळ्या रंगाची असते परंतु तिच्या डोक्यावरचा तुरा हा लाल रंगाचा असतो.
2- ही ऑस्ट्रेलियन वंशाची सुधारित गावठी कोंबडीची जात आहे.
3- विशेष म्हणजे या जातीच्या कोंबडीचे पालन तुम्ही परसबागेत करू शकतात आणि पोल्ट्री फार्म मध्ये देखील करू शकतात. दोन्हीही पद्धतीमध्ये ही चांगली उत्पन्न देते.
4- परस बागेमध्ये जर पालन केले तर अडीच महिन्यांमध्ये तिचे वजन सव्वा किलो पेक्षा जास्त होते.
5- साडे चार ते पाच महिन्याच्या कालावधी पूर्ण झाल्यानंतर ती अंडी द्यायला सुरुवात करते व त्यानंतर पुढे वर्षभर 120 ते 140 अंडी देते.
6- वयाच्या दोन ते अडीच महिन्यामध्ये ती मांसासाठी देखील वापरता येऊ शकते. या जातीच्या कोंबडीचे मांस चवीला देखील रुचकर असल्यामुळे त्याची मागणी जास्त असते.
7- विशेष म्हणजे कडकनाथ कोंबडी सारखाच या जातीचा कोंबडीचा रंग काळा असतो. परंतु कडकनाथ कोंबडीचे मांस आणि रक्ताचा रंग काळा नसून लालसर असल्यामुळे चिकन प्रेमी देखील या कोंबडीला जास्त प्रमाणात पसंती देतात.
अशा प्रमाणे तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये ब्लॅक ओस्ट्रॉलोर्प या कोंबडीचे पालन करून लाखो रुपये निश्चितच कमवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe