स्पेशल

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेच्या गुंतवणुकीतून मिळणार 68 लाखांपर्यंतचे रिटर्न ! कसं ते पहा ?

Published by
Tejas B Shelar

PPF Scheme : पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही एक गुंतवणुकीची सरकारी योजना असून यामध्ये अनेक जण पैसे गुंतवत आहेत. खरे तर आपल्या देशात सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व दाखवले जाते. यासाठी गुंतवणूकदार विविध योजनांमध्ये पैसे गुंतवतात. पोस्टाची एफडी अन बचत योजना, बँकेची एफडी योजना, आरडी योजना अशा विविध ठिकाणी पैसे गुंतवले जातात.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या सरकारी योजनेत देखील मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले जात आहेत. या योजनेत भारतातील कोणताही नागरिक पैसे गुंतवू शकतो. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही केंद्रातील सरकारकडून चालवली जाणारी योजना आहे. दरम्यान आज आपण या योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

कशी आहे पीपीएफ योजना?

जर तुम्हाला या योजनेत पैसा गुंतवायचा असेल तर तुम्ही बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये या योजनेसाठी अकाउंट ओपन करू शकता. या खात्यामध्ये किमान पाचशे रुपयांपासून ते कमाल दीड लाख रुपयांपर्यंतची वार्षिक गुंतवणूक करता येते. म्हणजेच तुम्ही एका वर्षात या योजनेत दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवू शकता.

तुम्ही यामध्ये मासिक गुंतवणूक करू शकता किंवा एकाच वेळी पैसे गुंतवले जाऊ शकतात. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही योजना पंधरा वर्षांची आहे. म्हणजेच पंधरा वर्षांमध्ये ही योजना परिपक्व होते. म्हणजेच आज तुम्ही यामध्ये गुंतवणूक सुरू केली तर आजपासून पंधरा वर्षांनी तुमचे अकाउंट मॅच्युअर होणार आहे.

या योजनेत गुंतवलेले पैसे तुम्हाला पंधरा वर्षांनी व्याजासकट परत मिळतात. महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा कालावधी वाढवता सुद्धा येतो. पाच पाच वर्षांनी या योजनेचा कालावधी वाढवता येतो.

योजनेचा कालावधी वाढवून तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पन्नास वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सरकारकडून 7.10% दराने परतावा दिला जातोय. म्हणजेच लॉन्ग टर्म एफडी च्या तुलनेत या योजनेतुन मिळणारा परतावा हा अधिक आहे.

कसे मिळणार 68 लाख?

पीपीएफ अकाउंट मध्ये जर एखाद्या गुंतवणूकदाराने 25 वर्षांसाठी वार्षिक एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला 25 वर्षांनी 68 लाख रुपये मिळणार आहेत. सध्या पीपीएफ अकाउंटवर 7.10% दराने परतावा दिला जातोय आणि हाच रेट पुढेही कायम राहिला तर वार्षिक एक लाख रुपये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 25 वर्षांनी 68 लाख 72 हजार दहा रुपये मिळणार आहेत.

यामध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक 25 लाखांची राहणार आहे आणि उर्वरित पैसे हे व्याजाचे राहतील. म्हणजेच पंचवीस वर्षात 25 लाख रुपये गुंतवणाऱ्या ग्राहकांना व्याज म्हणून 43 लाख 72 हजार दहा रुपये रिटर्न मिळणार आहेत.

गुंतवलेल्या रकमेवर कर्ज सुद्धा मिळणार?

या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर तुम्हाला कर्ज सुद्धा मिळते. यातून तुम्ही गुंतवलेल्या रकमेच्या 25 टक्के रक्कम तुम्हाला कर्ज स्वरूपात मिळू शकते. तसेच पीपीएफ योजनेचे अकाउंट ओपन करून गुंतवणूक सुरू केली आणि नंतर पुढील पाच वर्षांनी तुम्हाला पैशांची गरज भासली तर पाच वर्षानंतर तुम्ही या योजनेत जमा झालेल्या पैशांपैकी 50% रक्कम काढू शकता.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com