Prevention Tips From Mosquito:- डासांचा प्रादुर्भाव ही अशी एक समस्या आहे की तुम्ही घरामध्ये किती जरी स्वच्छता ठेवली तरी बऱ्याचदा घरामध्ये डासांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. जास्त करून स्वच्छता असली तरी देखील संध्याकाळच्या वेळेमध्ये डास भरपूर प्रमाणात त्रास देतात याचा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांना आला असेल.
त्यातल्या त्यात घराच्या आजूबाजूला अडगळीची जागा, तुंबलेले सांडपाणी किंवा इतर अस्वच्छता असेल तर मात्र डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतो. आपल्याला माहित आहेस की डासांच्या चाव्यामुळे अनेक आजारांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. डास चावल्याने मलेरिया, डेंगू यासारखे आजार देखील होऊ शकतात.
त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याकरिता किंवा डान्स घरातून पळवण्याकरिता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करत असतो. यात प्रामुख्याने वेगवेगळ्या कंपन्यांचे कॉइल्स, फास्ट कार्ड यासारखा वापर केला जातो. कधी कधी लिंबाच्या झाडाच्या पानांचा धूर देखील केला जातो.
परंतु हव्या त्या प्रमाणामध्ये डासांचे नियंत्रण शक्य होत नाही. त्यामुळे या लेखात आपण अशा काही झाडांची माहिती घेणार आहोत की ज्यांची लागवड तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला केली तर डास तुमच्या घराकडे थोडे देखील येणार नाहीत किंवा फिरकणार नाहीत.
घराच्या परिसरात लावा ही झाडे आणि डासापासून मिळवा मुक्तता
1- रोझमेरीचे रोपटे–जर तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा परिसरामध्ये रोझमेरीची रोप लावले तर डासांपासून मुक्तता मिळवण्यासाठी खूप फायद्याचे ठरू शकते. या रोपामुळे तुमच्या घराच्या आजूबाजूला डास फिरकत नाहीत. तुम्हाला देखील रोजमेरीचे रोप घ्यायचे असेल तर तुम्ही नर्सरीमधून किंवा ऑनलाइन गार्डनिंग शॉपिंग साइटवरून याची खरेदी करू शकतात.
2- तुळशीचे रोपटे– तुळशीला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. प्रत्येक घराच्या समोर तुळशी वृंदावनमध्ये तुळशीचे रोपटे ग्रामीण भागात आज देखील तेवढ्याच श्रद्धेने लावले जाते. ही तुळशी देखील डासांच्या नियंत्रणासाठी खूप उपयोगी आहे.
तुळशीचा जो काही सुवास येतो तो डासांना दूर ठेवण्यासाठी खूप मोठी मदत करत असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला जर तुळशीची लागवड केली तर घराभोवती किंवा घराच्या आसपास येत नाहीत.
3- पुदिन्याचे रोपटे– अनेक खाद्यपदार्थांमध्ये किंवा खाण्याच्या पदार्थांमध्ये आपण पुदिनाचा वापर करत असतो. आरोग्यासाठी देखील पुदिना हा खूप चांगला आहे. परंतु डासांच्या नियंत्रणाकरिता देखील पुदिना फायद्याचे ठरते. पुदिनाचा जो काही वास येतो त्या वासाने डास घराच्या जवळ फिरकत नाही व ते पळून जातात. त्यामुळे तीन किंवा चार कुंड्यांमध्ये जर तुम्ही घराच्या जवळ पुदिन्याची लागवड केली तर नक्कीच फायदा मिळतो.
4-
झेंडूच्या झाडांची लागवड– घराच्या आसपास जर तुम्ही झेंडूचे झाड लावले तर घराची शोभा वाढण्यासाठी मदत होतेच. परंतु या व्यतिरिक्त झेंडूच्या झाडांमुळे तुमच्या घरा जवळ साप देखील येत नाहीत. तसेच झेंडूला वेगवेगळ्या रंगाची फुले येत असल्यामुळे तुमच्या घरातचे सौंदर्य वाढण्यास देखील मदत होते. डास पळवण्यासाठी देखील झेंडू उपयुक्त आहे.5- लेमन ग्रास किंवा गवती चहा– लेमन ग्रास म्हणजेच गवती चहाची लागवड देखील तुम्हाला डासांपासून मुक्तता देऊ शकते. तसेच सर्दी, खोकला यावर देखील गवती चहा जर तुम्ही वापरली तर यापासून आराम मिळण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होते. त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये चहात गवती चहा टाकली जाते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि डासांपासून मुक्तता मिळवण्यासाठी या गवती चहाचा फायदा चांगला होतो.
6- लेमन बाम–ही एक पुदिनासारखी दिसणारी बारमाही औषधी वनस्पती असून आरोग्याला तर फायदा आहेच परंतु जर तुम्ही घराच्या परिसरात या औषधी वनस्पतीची लागवड केली तर डास तुमच्या घराच्या आजूबाजूला फिरकत नाहीत व डासांना पळवून लावण्यासाठी देखील ती खूप फायद्याची आहे.
या पद्धतीने तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला जर या झाडांची लागवड केली तर डासांपासून मुक्तता मिळवू शकतात.