अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाउंट हॅक झालं आहे. याबाबत पीएमओ कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे. ट्विटर अकाऊंट काही वेळाने पुन्हा सुरळीत करण्यात आलं. (Tweet account hacked)
मात्र अकाऊंट हॅक केल्यानंतर काही वेळातच हॅकर्सनी क्रिप्टोकरन्सीला प्रोत्साहन देणारं एक ट्वीट केलं होतं. नंतर हे ट्वीट डिलीट करण्यात आलं.
या संपूर्ण प्रकरणावर ट्विटरकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. काय होते ट्विट…. भारताने बीटकॉईनला कायदेशीर मान्यता दिल्याचं या ट्विटमधून म्हटलं आहे.
सरकारने ५०० बीटकॉईनची खरेदी केली असून देशवायिसांना दिले जाईल,असं हे ट्विट होतं. दोन मिनिटात हे ट्विट डिलीट करण्यात आलं.
दुसरे ट्विट… त्यानंतर २.१४ वाजता आणखी पहिल्या ट्विटसारखंच दुसरं ट्विट करण्यात आलं. त्यानंतर हे ट्विट देखील डिलिट झाले.
मोदी यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्यानंतर ट्विटर इंडियाने एक निवेदन जारी केले आहे. ट्विटरने म्हटले आहे की, “पीएम मोदींचे अकाऊंट हॅक झाल्याची माहिती मिळताच आम्ही लगेच सक्रिय झालो.
आमच्या आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की आतापर्यंत इतर कोणत्याही अकाउंटवर परिणाम झाल्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत.