Private Jet Price:- प्रत्येकाला श्रीमंत असणे किंवा आपण आयुष्यामध्ये श्रीमंत होणे ही इच्छा असते. व्यक्ती जेव्हा श्रीमंतीच्या दिशेने प्रवास करू लागतो किंवा श्रीमंत होतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे बदल तो करत असतो.
या बदलामध्ये प्रामुख्याने आलिशान बंगला तसेच बंगल्यासमोर ब्रँडेड आणि महागडी कार, ब्रँडेड कपड्यांपासून एक प्रकारे श्रीमंतीचे प्रदर्शन केले जाते. श्रीमंत लोकांचे राहणीमान हे इतर सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीचे असते व त्यांचा सामाजिक जीवनातील जो वावर असतो त्यावर देखील नकळतपणे त्यांच्या श्रीमंतीचा प्रभाव पडताना आपल्याला दिसून येतो.
या मुद्द्याला धरून जर आपण आपल्या देशातील श्रीमंत असे व्यक्ती म्हणजेच जे उद्योगपती आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर भौतिक सुख सोयी प्रदान करणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत. प्रामुख्याने देशातील प्रमुख उद्योगपतींकडे श्रीमंतीच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट असते
व ती म्हणजे त्यांचे खाजगी महागडे असे जेट होय. कारण कुठल्याही ठिकाणी जाताना त्यांचा वेळ वाचावा याकरता सर्वात उत्तम पर्याय म्हणून खाजगी विमाने हे व्यक्ती वापरतात.
म्हणून आपण या लेखांमध्ये खाजगी जेटची किंमत किती असते व भारतातील सर्वात महाग जेट कोणाकडे आहे व कोणकोणते व्यक्ती खाजगी जेट वापरतात? याबद्दलची माहिती बघू.
भारतामध्ये कोणकोणत्या व्यक्तींकडे आहेत खाजगी जेट?
भारतातील प्रमुख उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानींकडे खाजगी जेट असून त्या व्यतिरिक्त पंकज मुंजाल, कलानिधी मारण, लक्ष्मी मित्तल, नवीन जिंदाल, अदर पूनावाला आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यासारख्या उद्योगपतींकडे लांबचा प्रवास करता येईल या क्षमतेचे खाजगी विमाने आहेत.
या उद्योगपतींशिवाय अभिनेता शाहरुख खान तसेच अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांच्यासारख्या बॉलीवूडच्या दिग्गजांकडे देखील खाजगी जेट आहेत.तसेच रतन टाटा यांच्याकडे तर स्वतःचे डसॉल्ट फाल्कन खाजगी जेट आहे.
जगातील सर्वात महाग खाजगी जेट कोणत्या व्यक्तीकडे आहे?
भारतातील व्यक्तींचा विचार केला तर भारतातील सर्वात महागडे खाजगी जेट हे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे असून त्याची किंमत अंदाजे सहाशे तीन कोटी रुपये इतकी आहे. तर जागतिक पातळीवर सौदीचे राजकुमार अलवालीद बिन तलाल अल सौद यांच्याकडे जगातील सर्वात महागडे खाजगी जेट असून त्याची किंमत तब्बल चार हजार 100 कोटी रुपये आहे.
साधारणपणे किती असते खाजगी जेटची किंमत?
साधारणपणे खाजगी जेटची किंमत साधारणपणे किमान 20 कोटी रुपयांपासून सुरू होते तर एक अब्ज रुपयांपर्यंत देखील असू शकते. जेट विमानाचा आकार आणि त्यामध्ये असलेल्या सोयीसुविधा आणि वैशिष्ट्ये यावर त्यांची किंमत अवलंबून असते.
किमतीनुसार जर पाहिले तर सर्वात स्वस्त खाजगी जेट हे सिरस व्हिजन असून त्याची किंमत 16 कोटी रुपये आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या आकडेवारी पाहिली तर त्यानुसार भारतामध्ये 550 पेक्षा जास्त खाजगी जेट विमाने आहेत.