विवाहित बहीण भावाच्या संपत्तीवर दावा करू शकते का ? मालमत्तेचे ‘हे’ नियम तुम्हाला माहितीयेत का ?

आजही मालमत्तेशी संबंधित वादाच्या अनेक बातम्या आपल्याला पाहायला, ऐकायला आणि वाचायला मिळतात. मालमत्तेशी संबंधित वादाचे एक प्रमुख कारण म्हणजे आपल्या देशातील अनेक लोकांना मालमत्तेशी संबंधित कायद्यांची फारशी माहिती नाही. यामुळे आज आपण मालमत्ते विषयक कायद्यामधील एक महत्त्वाची तरतूद समजून घेणार आहोत.

Tejas B Shelar
Published:
Property Rights

Property Rights : आपल्या राज्यात, देशात मालमत्तेशी संबंधित वादांचा एक मोठा इतिहास राहिला आहे. मालमत्तेच्या संपत्तीवरून कुटुंबात मोठ्या प्रमाणात वाद विवाद होतात. मालमत्तेचे हे वाद सहमतीने सुटले नाहीत तर हे वाद विवाद न्यायालयात जातात आणि माननीय न्यायालयातच या प्रकरणात सुनावणी होत असते.

आजही मालमत्तेशी संबंधित वादाच्या अनेक बातम्या आपल्याला पाहायला, ऐकायला आणि वाचायला मिळतात. मालमत्तेशी संबंधित वादाचे एक प्रमुख कारण म्हणजे आपल्या देशातील अनेक लोकांना मालमत्तेशी संबंधित कायद्यांची फारशी माहिती नाही.

यामुळे आज आपण मालमत्ते विषयक कायद्यामधील एक महत्त्वाची तरतूद समजून घेणार आहोत. खरे तर अनेकांच्या माध्यमातून विवाहित बहीण आपल्या भावाच्या संपत्तीवर दावा करू शकते का? असा प्रश्न उपस्थित करत होते. यामुळे आज आपण याबाबत मालमत्तेच्या कायद्यांमध्ये नेमकी काय तरतूद आहे? या विषयी माहिती पाहणार आहोत.

विवाहित बहीण तिच्या भावाच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकते का. कोणत्या परिस्थितीत विवाहित बहीण तिच्या भावाच्या सर्व मालमत्तेवर हक्क सांगू शकते ? या प्रश्नांचे उत्तर आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

कायदा काय सांगतो?

मालमत्तेविषयक कायद्यात बहिणीच्या आणि मुलीच्या वाट्याबाबत महत्त्वाची तरतूद करून देण्यात आली आहे. कायद्यात मालमत्तेत बहिणी आणि मुलींच्या वाट्याबाबत विविध नियम आणि कायदे आहेत.

कायद्यानुसार, पालक स्वतःच्या कमाईतून मिळवलेली संपूर्ण संपत्ती आपल्या विवाहित मुलीला देऊ शकतात आणि अशा परिस्थितीत त्यांचा मुलगा म्हणजेच मुलीचा भाऊ काहीही करू शकत नाही.

तथापि, वडिलोपार्जित मालमत्तेच्या बाबतीत, भाऊ आणि बहिणीचा त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत समान वाटा असतो. हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) कायदा, 2005 नुसार, विवाहित बहीण तिच्या भावाच्या मालमत्तेवर काही विशिष्ट परिस्थितींमध्येच दावा करू शकते.

कायद्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू मृत्यूपत्र न लिहिता झाला आणि त्याच्या मालमत्तेवर दावा करण्यासाठी पत्नी, मुलगा किंवा मुलगी असे कोणतेही वर्ग I दावेदार नसतील.

त्यामुळे अशा परिस्थितीत, त्या व्यक्तीची बहीण (वर्ग II दावेदार) तिच्या भावाच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकते. अशा परिस्थितीत बहिणीला भावाच्या मालमत्तेवर हक्क सांगण्याचा अधिकार देशाचा कायदा देतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe