Property Rights : भारतात मालमत्तेवरून नेहमीच वाद वाद होतात. कुटुंबामध्ये संपत्तीच्या कारणांवरून मोठमोठे वाद वाहत होतात आणि अनेकदा हे वादविवाद भांडणाचे रूप घेतात. अनेकदा संपत्तीच्या कारणांवरील हे वाद न्यायालयात जातात आणि न्यायालयातून या वादावर तोडगा निघत असतो.
संपत्तीच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाद विवाद होत असतात. विशेषतः घटस्फोटाच्या वेळी अशी प्रकरणे समोर येतात. घटस्फोट घेताना पत्नी पतीच्या संपत्तीवर दावा ठोकत असते.
दरम्यान आज आपण अशाचं एका संपत्ती विषयक बाबीची माहिती पाहणार आहोत. आज आपण दुसऱ्या पत्नीचा पतीच्या प्रॉपर्टी मध्ये हिस्सा असतो का? या बाबी संदर्भात सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कायदा काय सांगतो ?
कायदेविषयक बाबीचे जाणकार असलेल्या लोकांनी पतीच्या मालमत्तेमध्ये दुसऱ्या पत्नीचे हक्क प्रामुख्याने २ कारणांच्या आधारे निश्चित केले जातात, असे म्हटले आहे. तज्ञ सांगतात की, विवाहाची कायदेशीर वैधता आणि धार्मिक आधारांवर लागू होणारे नियम आणि कायदे या दोन बाबींवर दुसऱ्या पत्नीचा पतीच्या मालमत्तेमधील हिस्सा निश्चित होतो.
दुसऱ्या पत्नीचा विवाह जर हा कायद्याने वैध ठरत असेल तर अशा प्रकरणात दुसऱ्या पत्नीला आपल्या पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळत असतो. भारतीय वारस कायद्यानुसार दुसऱ्या पत्नीचा विवाह जर वैध असेल तर तिला पहिल्या पत्नीप्रमाणेच सर्व अधिकार बहाल केलेले आहेत.
पहिल्या पत्नीला पतीच्या मालमत्तेत जेवढा अधिकार मिळतो तेवढाच दुसऱ्या पत्नीला सुद्धा मिळतो. आता आपण दुसऱ्या पत्नीचा विवाह वैध केव्हा ठरतो? हे समजून घेऊयात.
तज्ञ लोकांनी सांगितल्याप्रमाणे, हिंदू विवाह कायदा, १९५५ नुसार, दोघांपैकी कोणाचाही जोडीदार हयात नसेल किंवा त्यांच्यात घटस्फोट झाला असेल तरच दुसऱ्या विवाहाला कायदेशीर दर्जा मिळत असतो.
या दोनपैकी एक अटी पूर्ण केली की, दुसरा विवाह वैध ठरतो. जर समजा दुसऱ्या पत्नीचा विवाह कायद्याने वैध नसेल तर अशा प्रकरणात दुसऱ्या पत्नीला पतीच्या नावे असणाऱ्या वडिलोपार्जित संपत्तीवर कोणताच दावा सांगता येत नाही.
परंतु पतीने स्वतः कमावलेल्या स्वअर्जित ही अट लागू होत नाही. स्वतः कमावलेल्या संपत्तीचे वाटप पती मृत्युपत्राद्वारे दुसऱ्या पत्नीसहित सर्वांना करू शकतो.
जर समजा मृत्यूपत्र बनवलेले नसेल आणि जर पतीचा मृत्यू झाला तर त्याची मालमत्ता त्याच्या कायदेशीर वारसांमध्ये विभागली जात असते. अशा प्रकरणांमध्ये उत्तराधिकार कायद्यानुसार पतीच्या सर्व वारसांमध्ये त्याच्या मालमत्तेचे समान वाटप केले जात असते.