स्पेशल

हायकोर्टाचा सर्वात मोठा निर्णय ! आईच्या संपत्तीवर मुलाचा अन मुलीचा हक्क राहणार नाही, वाचा सविस्तर

Published by
Tejas B Shelar

Property Rights : राज्यात तसेच देशात संपत्तीवरून मोठ्या प्रमाणात वादविवाद पाहायला मिळतात. संपत्तीवरून होणारे वादविवाद अनेकदा न्यायालयात जातात. संपत्तीच्या कारणावरून मोठ्या प्रमाणात हाणामारीच्या घटना सुद्धा घडतात. खरे तर देशात संपत्ती विषयक अनेक कायदे आहेत. या कायद्यात वेळोवेळी सुधारणा होत आहेत.

मात्र सर्वसामान्य नागरिकांना संपत्ती विषयक सर्वच कायद्यांची माहिती नसते आणि यामुळे मालमत्तेवरून मोठा गोंधळ होतो, कुटुंबात यावरून वाद विवाद सुरू होतात. संपत्तीची प्रकरणी न्यायालयात जातात. दरम्यान अशाच एका संपत्तीच्या प्रकरणात हायकोर्टाने नुकताच एक महत्त्वाचा निकाल दिला आहे.

खरेतर वडिलांच्या संपत्तीवर मुलाचा आणि मुलीचा समान अधिकार असतो. वडिलोपार्जित संपत्ती मध्ये मुलाला आणि मुलीला अगदीच मुलगी विवाहित असली तरी देखील तिला समान वाटा देण्याची तरतूद आहे.

जर वडिलांनी स्वतः संपत्ती कमावली असेल तर अशा प्रकरणांमध्ये वडिलांच्या इच्छेनुसारच संपत्तीचे वाटप होते. मात्र जर वडिलांचे निधन इच्छापत्र न बनवता झाले तर अशा संपत्तीत देखील मुलगा आणि मुलगी वाटेदार असतात. पण, माननीय उच्च न्यायालयाने आईच्या संपत्तीवर मुलाचा आणि मुलीचा अधिकार नसतो, असं म्हणत एक प्रकरण निकाली काढले आहे.

दरम्यान आता आपण माननीय उच्च न्यायालयात आलेल्या याचं प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि या प्रकरणात न्यायालयाने नेमके काय मत नोंदवले आहे, काय निकाल दिला आहे? याबाबतही तपशीलवार माहिती पाहणार आहोत.

काय होत प्रकरण?

हे प्रकरण आहे दिल्लीमधील. राष्ट्रीय राजधानी दिल्ली मधील उत्तर पश्चिम दिल्लीतील शास्त्री नगर येथील एका 85 वर्षीय महिलेने आपल्या मुलीच्या विरोधात आणि जावयाच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी माननीय दिल्ली उच्च न्यायालयात त्यांची मुलगी आणि जावई त्यांच्या संपत्तीवर अनधिकृत ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हणतं याचिका दाखल केली होती.

लाजवंती देवी असे या याचिकाकर्त्या महिलेचे नाव. मंडळी 1985 मध्ये लाजवंती देवी यांनी आपल्या मुलीला आणि जावयाला राहण्यासाठी घराचा काही भाग दिला होता. पण आता मुलीला आणि जावयाला दिलेले घर ते रिकामे करत नाहीयेत. म्हणजे मुलगी आणि जावई लाजवंती देवी यांच्या संपत्ती वर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसतायेत.

म्हणून लाजवंती देवी माननीय उच्च न्यायालयात गेल्यात आणि न्यायालयाने आता या प्रकरणात लाजवंती देवी यांच्याच बाजूने निर्णय दिलाय. खरेतर, लाजवंती देवी यांची ही संपत्ती त्यांच्या पतीने 1966 मध्ये खरेदी केली होती. महत्त्वाचे म्हणजे ही संपत्ती लाजवंती देवी यांच्याच नावाने खरेदी करण्यात आली होती.

म्हणून माननीय न्यायालयाने आता त्यांच्या पतीच्या निधनानंतर या संपत्तीवरील संपूर्ण अधिकार हा लाजवंतीदेवी यांचा आहे, असे निरीक्षण नोंदवले आहे. तसेच माननीय न्यायालयाने सहा महिन्यात लाजवंती देवी यांचे घर मुलीला आणि जावयाला रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत.

2014 पासून सुरू असणाऱ्या या सुनावणीच्या काळात मुलीला आणि जावयाला प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे संपत्ती सोडण्याच्या दिवसापर्यंत महिन्याला दहा हजार रुपये दंड म्हणून भरावे लागणार आहेत.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com