Property Rules :- जर तुम्हीही प्रॉपर्टीची खरेदी-विक्री करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. प्रॉपर्टीची खरेदी आणि विक्री ही एक अतिशय क्लिष्ट प्रक्रिया आहे. यामध्ये खरेदीदार आणि विक्री करणाऱ्या लोकांना अधिक सावधानता बाळगावी लागते. जर प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीमध्ये सावधानता बाळगली नाही तर फसवणूक होण्याची दाट शक्यता असते.
खरंतर कोणत्याही प्रॉपर्टीची म्हणजेच घराची, जमिनीची खरेदी करताना अनेक खरेदीदार लोक त्या प्रॉपर्टीची रजिस्ट्री चेक करतात. रजिस्ट्री चेक केल्यानंतर ती प्रॉपर्टी खरेदी करताना रजिस्ट्री करतात आणि त्यांना ती प्रॉपर्टी आपल्या मालकीची झाली असे वाटते. मात्र केवळ रजिस्ट्री केल्याने ती प्रॉपर्टी किंवा मालमत्ता त्या व्यक्तीच्या मालकीची बनत नसते.
आता तुम्हाला निश्चितच असा प्रश्न पडला असेल की, प्रॉपर्टी किंवा मालमत्ता रजिस्ट्री केल्यानंतरही मालकीची बनत नाही मग प्रॉपर्टी मालकीची बनवण्यासाठी कोणती प्रोसेस असते, त्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागते किंवा कोणते कागदपत्र आवश्यक असते. तर आम्ही आपणास प्रॉपर्टी किंवा मालमत्ता केव्हा व्यक्तीच्या मालकीची बनते, याची प्रोसेस काय असते याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
प्रॉपर्टी मालकीची केव्हा होते
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार प्रॉपर्टीची रजिस्ट्री झाल्यानंतर लगेचच ती प्रॉपर्टी खरेदीदार व्यक्तीची होत नसते. यासाठी आणखी एक डॉक्युमेंट संबंधित खरेदीदार व्यक्तीला घ्यावे लागते. किंवा रजिस्ट्री नंतर देखील एक प्रोसेस पूर्ण करावी लागते ज्यानंतर संबंधित प्रॉपर्टी ही खरेदीदार व्यक्तीच्या मालकीची बनत असते. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रॉपर्टीच्या खरेदीनंतर कोणत्याही प्रकारचे वादविवाद होऊ नये यासाठी प्रॉपर्टीची रजिस्ट्री कम्प्लीट केल्यानंतर त्या प्रॉपर्टीचे नामांतरण म्हणजेच म्युटेशन देखील करावे लागते. नामांतरण कम्प्लीट झाल्यानंतरच प्रॉपर्टीची मालकी ही खरेदीदार व्यक्तीकडे पूर्णपणे जाते. अर्थातच केवळ सेल डिडने प्रॉपर्टीचे नामांतरण पूर्ण होत नाही. सेलडिड नंतर नामांतर कराव लागते.
नामांतर केल्याशिवाय प्रॉपर्टी नावावर होत नाही
जाणकार लोक सांगतात की, सेल डिड आणि नामांतर या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. खरतर रजिस्ट्री झाली म्हणजेच संपत्ती नावावर झाली असे समजले जाते. मात्र हा एक केवळ समज आहे. प्रॉपर्टी रजिस्ट्री केल्यानंतर थेट नावावर होत नाही. यासाठी नामांतर करावे लागते. जोपर्यंत कोणत्याही मालमत्तेचे अर्थातच प्रॉपर्टीचे नाव नामांतरण केलं जात नाही तोपर्यंत प्रॉपर्टी खरेदीदार व्यक्तीच्या नावे होत नाही. यामुळे जरी रजिस्ट्री कम्प्लीट झालेली असली तरी देखील जोपर्यंत नामांतर होत नाही तोपर्यंत ती प्रॉपर्टी म्हणजेच संपत्ती ही पूर्वीच्या मालकाच्या नावे असते किंवा मालकीची असते असं आपण म्हणू शकतो.
म्हणून जर तुम्ही एखादी मालमत्ता सेल डीडद्वारे खरेदी केली किंवा इतर कोणत्याही मार्गाने संपादित केली की त्यानंतर तुम्हाला नामांतरण करावे लागणार आहे. यासाठी आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधित कार्यालयात हजर राहून मालमत्तेचे नामांतरण तुम्हाला करावे लागणार आहे. नामांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती प्रॉपर्टी मग तुमच्या नावावर होते. अर्थातच त्या प्रॉपर्टीची मालकी तुमच्याकडे येते. याचाच अर्थ केवळ रजिस्ट्री कम्प्लीट केल्यानंतर कोणत्याही प्रॉपर्टीची मालकी खरेदीदार व्यक्तीकडे जात नाही. यासाठी नामांतरणाची प्रक्रिया करावी लागते.