स्पेशल

सार्वजनिकरीत्या मान्यता मिळालेल्या तृतियपंथीय डान्सरने प्रियकराशी पुन्हा विवाह केला !

Published by
Ahmednagarlive24 Office

Marathi News : चीनमध्ये सार्वजनिकरीत्या मान्यता मिळालेल्या तृतियपंथीय डान्सरने प्रियकराशी पुन्हा विवाह केला. १८ वर्षांपूर्वी तिने घटस्फोट घेतला होता. ईशान्य चीनमधील लियाओनिंग प्रांतातील ५६ वर्षीय जिन झिंगचे विबोवर १४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

जिन झिंग एक प्रसिद्ध नृत्य कलाकार आहे. एप्रिल १९९५ मध्ये जिनने बीजिंगच्या रुग्णालयात लिंग बदलण्याची शस्त्रक्रिया केली आणि ती चीनची पहिली सार्वजनिकरीत्या मान्यताप्राप्त तृतियपंथी व्यक्ती बनली. ‘मिस जिन झिंग’ या चित्रपटात तिच्या शस्त्रक्रियेच्या प्रवासाचे दस्तावेजीकरण करण्यात आले होते.

याबद्दल चीनमधील काही प्रसारमाध्यमांनी म्हटले होते की, ‘जिन झिंगने तिची धाडसी, खरी आणि तरीही एकाकी बाजू उघड केली.’ शस्त्रक्रियेदरम्यान एका परिचारिकेने केलेल्या चुकीमुळे जिनचा डावा पाय वैद्यकीय उपकरणांनी १६ तास आकुंचन पावला.

त्यामुळे तिला अर्धांगवायू झाला. एका नर्तकासाठी हा मोठा धक्का होता. मात्र वर्षभरातच ती पूर्णपणे बरी झाली आणि आश्चर्यकारक इच्छाशक्ती दाखवत बीजिंगमध्ये पुन्हा स्टेजवर दिसली. पुढे तिने शांघाय जिन झिंग डान्स थिएटरची स्थापना केली.

फेब्रुवारी २००४ मध्ये पॅरिसहून शांघायला जाणाऱ्या विमानात जिनची भेट जर्मन नागरिक हेन्झ गर्ड ओइडमन याच्याशी झाली. तो पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडला. जिनने त्याला सांगितले की, ती एक पुरुष आहे. ‘आपल्यासमोरची स्त्री कोणत्याही पुरुषासाठी एक मोठे आव्हान असते,’ असे ती हेन्झ ओइडमनला म्हणाली.

नंतर तिने दोन मुले आणि एक मुलगी दत्तक घेतल्याचेही त्याला सांगितले. २००५ मध्ये या दोघांनी लग्न केले आणि जिनसोबत राहण्यासाठी ओइडमन चीनला आला.

मात्र, २००६ मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला. जिनने स्पष्ट केले की, मोठ्या मुलाच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी घटस्फोट घेतला. वास्तवात मुद्दा दत्तक विधानासंबंधीचा होता. परदेशी म्हणून ओइडमनला आंतरराष्ट्रीय दत्तक विधान करण्यासाठी पात्र होण्यासाठी एक वर्ष प्रतीक्षा करावी लागली.

दरम्यान, दोघांनी आपल्या तीन दत्तक मुलांचे सहपालक म्हणून काम सुरूच ठेवले आणि २०१८ मध्ये त्यांनी इटलीमध्ये गुपचूप दुसरे लग्न केले. ही माहिती तिने नुकतीच म्हणजेच ११ एप्रिलला उघड केली.

२००६ मध्ये मुलांसाठी घटस्फोट घेण्यास भाग पाडले गेले, आम्ही १८ वर्षांनंतर पुन्हा लग्न केले आणि आमचे प्रेम आणि जबाबदारीचा महत्त्वाची आहे, असे जिनने ऑनलाइन पोस्टमध्ये लिहिले आहे.

Ahmednagarlive24 Office