Pune Goa Railway News : पुणे ते गोवा असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरे तर पुण्याहून गोव्याला जाणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर गोव्याला हजेरी लावत असतात.
यामुळे वर्षाअखेर या मार्गावरील एक्सप्रेस ट्रेन मध्ये तिकीट मिळवणे अवघड बाब आहे. दरम्यान प्रवाशांची ही अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून पुणे ते करमाळी दरम्यान साप्ताहिक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. ही गाडी नियमित राहणार नसून एका लिमिटेड कालावधीसाठी चालवली जाणार असून आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पुणे ते करमाळी दरम्यान चालवल्या जाणाऱ्या या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील 17 महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
यामुळे पुण्याहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना देखील या गाडीचा फायदा होणार आहे. आता आपण या गाडीची संपूर्ण डिटेल जाणून घेणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक?
पुणे ते करमाळी ही विशेष गाडी दि. २५.१२.२०४ ते दि. ०८.०१.२०२५ या दरम्यान चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी दर बुधवारी ०५.१० वाजता पुणे येथून सुटेल आणि करमाळी येथे त्याच दिवशी २०.२५ वाजता पोहोचणार आहे.
म्हणजेच या गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होणार आहेत. तसेच करमाळी ते पुणे ही गाडी दि. २५.१२.२०२४ ते दि. ०८.०१.२०२५ दरम्यान चालवली जाणार असून या काळात ही गाडी दर बुधवारी करमाळी येथून २२.२० वाजता सोडली जाणार आहे आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १३.०० वाजता पोहोचणार आहे.
या विशेष ट्रेनच्या देखील तीन फेऱ्या होणार आहेत. या गाडीच्या पुणे ते करमाळी अशा तीन आणि करमाळी ते पुणे अशा तीन म्हणजे एकूण सहा फेऱ्या होणार आहेत.
कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार?
रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला 17 महत्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आलेला आहे. ही ट्रेन चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.