खवय्यांसाठी आनंदाची बातमी ! हापूस आंब्याच्या दरात 700 रुपयांची घसरण, हापूसचे पुण्यातील लेटेस्ट रेट कसे आहेत ?

गुढीपाडव्यानंतर हापूस आंब्याच्या रेट मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली आहे. म्हणून खवय्यांसाठी ही एक आनंदाची पर्वणी ठरण्याची शक्यता आहे. गुढीपाडव्याच्या काळात आंब्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती आणि यामुळे दरातही वाढ पाहायला मिळाली. पण आता आंब्याचे रेट कमी होत आहेत.

Published on -

Pune Hapus Rate : खवय्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे हापूस आंब्याच्या दरात तब्बल सातशे रुपयांपर्यंतची घसरण झाली आहे. महाराष्ट्रात नुकताच गुढीपाडव्याचा मोठा सण साजरा झाला. गुढीपाडवा हे साडेतीन मुहूर्तांपैकी एक. गुढीपाडव्यापासूनच मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते.

यामुळे हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि थाटात संपन्न होतो. या दिवशी महाराष्ट्रात सर्वत्र आमरस आणि पुरणाची पोळी बनवली जाते. यामुळे गुढीपाडव्याच्या काळात दरवर्षी आंब्यांची मागणी वाढते. नेहमीप्रमाणे यंदाही या काळात आंब्यांना मोठी मागणी आली होती.

यंदा गुढीपाडव्याच्या दरम्यान पुणे येथील मार्केट यार्डमध्ये हापुस आंब्यांची मागणी झपाट्याने वाढली होती. या काळात आंब्यांचा पुरवठा दुप्पट होऊन दररोज 1,000 ते 2,000 क्रेट्सवरून 4,000 ते 5,000 क्रेट्सपर्यंत पोहचला होता.

मात्र, गुढीपाडव्याचा सण आटोपल्यानंतर हापूस आंब्याच्या मागणीमध्ये घट आली अन याचाच परिणाम म्हणून हापुस आंब्यांच्या किमतींमध्ये मोठी घट आली आहे. आंब्यांच्या किमतीत मागील आठवड्याच्या तुलनेत जवळपास 300 ते 600 रुपयांची घसरण झाली आहे.

सध्या किरकोळ विक्रेत्यांकडून हापुस आंबा 700 ते 1,200 रुपये प्रति डझन या दरात विकला जात आहे. मागील आठवड्यात किरकोळ विक्रेत्यांकडून हजार ते 1800 रुपये प्रति डझन या दरात हापूसची विक्री केली जात होती. खरेतर यावर्षी आंबा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे.

कोकणातील अनिश्चित हवामानामुळे या वर्षी आंब्यांच्या उत्पादनात 40% घट होण्याची शक्यता जाणकार लोकांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे. प्रारंभिक फुलांची अवस्था कमी होत असल्याने, हंगामाच्या सुरुवातीला आंब्यांचा पुरवठा कमी होता.

गुढीपाडवा सणाच्या वेळी जरी आंब्यांची पुरवठा उच्च होता, तरी यावर्षी सुरुवातीला पुरवठा कमी होता आणि तो सणानंतरच वाढला. दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे आणि काही ठिकाणी अवकाळी पाऊस देखील होतोय.

मात्र असे असले तरी व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की यामुळे आंब्याच्या पीकाला तात्काळ धोका पोहचणार नाही. तथापि, पाऊस व वादळांची शक्यता असल्यामुळे आणखी आंबे गळून पडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, जो पुरवठ्यात आणखी घट करू शकतो.

त्यामुळे पुढील काही आठवड्यांमध्ये हापुस आंब्यांचा पुरवठा हवामानावर अवलंबून असणार आहे. दरम्यान आंब्याचा पुरवठा कमी झाला की साहजिकच याचा किमतीवर देखील परिणाम होणार आहे. यामुळे अक्षय तृतीयाला आता आंब्याला काय रेट मिळणार याकडे सर्वसामान्यांच्या नजरा राहणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News