Pune Latur Railway News : गेल्या काही वर्षांपासून लातूरकरांनी पुणे ते लातूर अशी स्पेशल एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी लावून धरली आहे. यासाठी आता लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून देखील प्रयत्न केले जात आहेत.
विशेष म्हणजे रेल्वे प्रशासनाने देखील पुणे ते लातूर स्पेशल एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार केला असून हा प्रस्ताव मुख्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. दरम्यान लातूरकरांसाठी तत्पूर्वी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे मध्य रेल्वेच्या माध्यमातून उन्हाळी हंगामातील सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे-हैदराबाद अशी विशेष एक्सप्रेस सुरू करण्यात आले आहे ती एक्सप्रेस आता लातूर रेल्वे स्थानकावर देखील थांबणार आहे.
हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! आता नासिकमधून ‘या’ शहरादरम्यान सुरू होणार किमान सेवा, प्रवाशांचा प्रवास होणार सुसाट
त्यामुळे लातूरकरांना पुण्याचा प्रवास वेगाने करता येणार असून मुंबईकडील प्रवास देखील लातूरकरांना जलद गतीने करता येणे शक्य होणार आहे. निश्चितच मुंबई पुणे हैद्राबाद एक्सप्रेस लातूर मार्गे धावणार असल्याने लातूरकरांना या ट्रेनचा लाभ निश्चितच होणार आहे. दरम्यान आज आपण या ट्रेनच्या वेळापत्रकाबाबत सर्व आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं असणार वेळापत्रक
मुंबई-पुणे-हैदराबाद विशेष एक्सप्रेस आठवड्यातून एकदाच होणार आहे. म्हणजेच ही एक साप्ताहिक गाडी राहणार आहे. गाडी क्रमांक 01137 ही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर बुधवारी रात्री साडेबारा वाजता सुटणार आहे लातूर रेल्वे स्थानकामध्ये रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी दाखल होईल आणि मग हैदराबाद रेल्वे स्थानकावर ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजून 30 मिनिटांनी दाखल होणार आहे.
हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! ‘या’ बँकेत निघाली मोठी भरती, पगार मिळणार तब्बल 89 हजार, पहा डिटेल्स
यासोबतच परतीच्या प्रवासाबाबत म्हणजेच हैदराबाद-पुणे-मुंबई रेल्वेच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर गाडी क्रमांक 01138 ही गाडी रात्री आठ वाजता हैदराबाद स्थानकातून मुंबईकडे प्रस्थान करणार आहे.
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 3 वाजून तीस मिनिटांनी ही गाडी लातूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे आणि मग पुढे मुंबई स्थानकावर जाणार आहे.
कुठे राहतील थांबे?
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विशेष साप्ताहिक एक्सप्रेस गाडीला CSMT, दादर, ठाणे, कल्याण, लाेणावळा, पुणे, दाैंड, कुर्डूवाडी, बार्शी टाउन, धाराशिव, लातूर, लातूर राेड, उदगीर, भालकी, बिदर, जहिराबाद, विकाराबाद, लिंगमपल्ली, बेगमपेठ, हैद्राबाद या रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा राहणार आहे.
हे पण वाचा :- रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! अकोला मार्गे धावणारी ‘ही’ सुपरफास्ट ट्रेन सुरु झाली, पहा संपूर्ण वेळापत्रक