Pune Nashik Railway Breaking News : मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिक ही दोन महत्त्वाची शहरे परस्परांना थेट रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. पुणे राज्याची सांस्कृतिक राजधानी, एक महत्त्वाच पर्यटन स्थळ तसेच नासिक वाईन सिटी म्हणून जगात ख्याती प्राप्त आणि एक महत्त्वाची कृषी बाजारपेठ आहे.
अशा परिस्थितीत या दोन्ही शहरांना कनेक्टिव्हिटी देण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी एक हजार रुपये तरतूद करण्यात आली. तसेच राज्य शासनाकडून देखील या प्रकल्पाला तत्वतः मान्यता बहाल करण्यात आली आहे. परंतु राज्य शासनाने तत्वतः मान्यता दिल्यानंतर आता जवळपास चार महिन्यांचा कालावधी उलटला आहे मात्र तरीही या प्रकल्पाबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पामध्ये काही तांत्रिक त्रुट्या काढण्यात आले आहेत. त्यामुळे आता हा प्रकल्प पुन्हा बारगळतो की काय? प्रकल्प पूर्ण होणार का? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकल्पासंदर्भात फेब्रुवारी महिन्यात एक मोठी डेव्हलपमेंट पाहायला मिळाली.
फेब्रुवारीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वेला तत्वतः मान्यता दिल्याचे जाहीर करण्यात आले. यानंतर या प्रकल्पाचा अहवाल केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे सादर झाला. यामुळे लवकरच रेल्वे मंत्रालयाकडून या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र अद्याप या प्रकल्पावर काहीच निर्णय झालेला नाही. या प्रकल्पाला अद्याप अंतिम मान्यता मिळालेली नाही.
हे पण वाचा :- महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा मुंबईत; ठाणे ते पश्चिम उपनगरातील ‘या’ शहराच अंतर फक्त 15 मिनिटात होणार पार, पहा….
वास्तविक हा प्रकल्प उभारण्यासाठी जवळपास 60 टक्के निधी बँकांच्या माध्यमातून उभारला जाणार आहे. बँकेकडून कर्ज घेऊन 60% निधीची उभारणी करण्याचे नियोजन आहे. यासाठी महा रेलने वेगवेगळ्या बँकांकडे प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. परंतु शासनाकडून या प्रकल्पावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याने बँकांकडून फाईल पुढे जात नसल्याचे चित्र आहे. यामुळे आता या प्रकल्पाचे भवितव्य नेमके काय राहते याबाबत पुणे आणि नाशिककरांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
कसा राहणार आहे प्रकल्प?
या प्रकल्पाची लांबी 235 किलोमीटर राहणार आहे. यात 20 स्टेशन प्रस्तावित असतील. प्रकल्पांतर्गत 18 बोगदे आणि 70 पूल तयार केले जाणार आहेत. या प्रकल्पामध्ये तब्बल 96 भुयारी मार्ग तयार होणार आहेत. हा प्रकल्प पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यातून प्रस्तावित करण्यात आला आहे. हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यातील एकूण 54 गावांमधून हा रेल्वे मार्ग जाणार आहे.