पुण्याला मिळणार 14 पदरी महामार्गाची भेट ! पुण्याहून ‘या’ शहरासाठी तयार होणार चौदापदरी मार्ग, नितीन गडकरी यांची सर्वात मोठी घोषणा

गडकरी यांच्या या नव्या घोषणेमुळे मुंबई आणि पुण्याला एका नवीन महामार्गाची भेट मिळणार हे स्पष्ट होत आहे. यामुळे आगामी काळात पुणे ते मुंबई दरम्यान चा प्रवास तर वेगवान होणारच आहे शिवाय राज्याच्या एकात्मिक विकासाला यामुळे आणखी गती मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात तयार होणारा हा नवीन महामार्ग तब्बल 14 पदरी राहणार आहे. म्हणजेच हा एक महाकाय आणि भव्य असा रस्ते महामार्ग असेल.

Tejas B Shelar
Published:

Pune New Expressway News : गत दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात महामार्गांचे जाळे विस्तारण्यात आले आहे. रस्त्यांची कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी शासनाने आणि प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आतापर्यंत देशात हजारो किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे जाळे विकसित झाले आहे.

महत्त्वाचे म्हणजे आगामी काळात आणखी काही नवीन महामार्ग देशाला मिळणार आहेत.अशातच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

गडकरी यांच्या या नव्या घोषणेमुळे मुंबई आणि पुण्याला एका नवीन महामार्गाची भेट मिळणार हे स्पष्ट होत आहे. यामुळे आगामी काळात पुणे ते मुंबई दरम्यान चा प्रवास तर वेगवान होणारच आहे शिवाय राज्याच्या एकात्मिक विकासाला यामुळे आणखी गती मिळणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात तयार होणारा हा नवीन महामार्ग तब्बल 14 पदरी राहणार आहे. म्हणजेच हा एक महाकाय आणि भव्य असा रस्ते महामार्ग असेल.

या महामार्ग प्रकल्पामुळे महाराष्ट्राची सुंदरता तर वाढणारच आहे शिवाय महाराष्ट्र कृषी, शिक्षण, उद्योग, पर्यटन अशा विविध क्षेत्रात चांगली प्रगती करू शकणार आहे. दरम्यान आता आपण गडकरी यांनी घोषित केलेला हा महामार्ग प्रकल्प नेमका कसा आहे याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

कसा राहणार महाराष्ट्रातील 14 पदरी महामार्ग

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने अभियंता दिनी आयाेजित ‘सीओईपी अभिमान पुरस्कार’ प्रदान साेहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हजेरी लावली होती.

या सोहळ्यात नितीन गडकरी यांनी एक भन्नाट भाषण दिले. या भाषणात त्यांनी म्हटले की, मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गामुळे पुढील 50 वर्षे वाहतुकीला काही अडचण निर्माण हाेणार नाही असे आपण म्हणायचाे, मात्र अद्यापही वाहतुक काेंडीचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही.

हेच कारण आहे की आता मुंबई ते बंगळुरू दरम्यान 14 पदरी द्रुतगती महामार्ग तयार केला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

म्हणजे भविष्यात अटल सेतूवरून बाहेर पडताच मुंबई ते बंगळुरू चाैदा पदरी द्रुतगती महामार्गाने प्रवास करता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या कामाचे कंत्राट नुकतेच निघाले आहे.

हा महामार्ग पुण्याच्या रिंगराेडला जाेडला जाणार असून पुढील सहा महिन्यांत कामाला सुरूवात हाेईल अशी घाेषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. त्यामुळे पुणे- मुंबई प्रवास आणखी वेगवान हाेणार अशी आशा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe