स्पेशल

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! पुणे ते ठाणे प्रवास होणार वेगवान, ‘या’ महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात

Published by
Tejas B Shelar

Pune News : कोकणातील ठाणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे येत्या काही दिवसात पुणे ते ठाणे हा प्रवास वेगवान होणार आहे. ठाण्याहून नासिक आणि पुण्याकडील प्रवास येत्या काही दिवसात सुपरफास्ट होणार असून ठाण्यातील एक महत्त्वाचा महामार्ग प्रकल्प लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गेल्या दोन वर्षांपासून ठाणे-वडपे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. दुतर्फा १२ पदरीचा हा महामार्ग आहे. त्यात दोन्ही बाजूला दोन-दोन पदरी सेवा रस्त्याचा समावेश आहे. यापैकी नाशिककडे जाणाऱ्या लेनचे काम जलदगतीने पुढे सरकत आहे.

माजिवडा ते साकेत पुलाच्यादरम्यान असलेल्या मार्गाचे दोनपदरी सिमेंट काँक्रीटचे काम पूर्ण सुद्धा झाले आहे. एवढेच नाही तर, लोढा संकुलजवळ रस्त्याखाली सुरू असलेल्या मोठ्या गटाराचे काम देखील पूर्ण झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

यावरून सध्या नाशिककडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरू आहे. आता याच मार्गिकेला लागून आणखीन दोनपदरी काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काँक्रिटीकरणाचे काम अहोरात्र सुरू असून लवकरच हे काम देखील पूर्ण होणार आहे.

ठाणे ते वडपेदरम्यान सुरू असलेल्या या मार्गाचे काम जवळपास निम्म्याहून अधिक पूर्ण झाले आहे. यां महामार्गाचे 70% काम पूर्ण झाले असून उर्वरित 30 टक्के काम देखील लवकरच पूर्ण होणार आहे. अर्थातच ठाणे-वडपे महामार्ग आता लवकरच पूर्ण होणार आहे.

माजिवडा पुलापासून सुरू झालेल्या यां मार्गाचे काम लवकरच पूर्ण होईल अन त्यानंतर ठाणे ते नाशिक आणि पुढे पुण्याचा प्रवास वेगवान होणार आहे. ठाणे वडपे हे अंतर २२ किलोमीटरचे आहे. त्यातील १३ किलोमीटर रस्ता रुंदीकरणाचे काम रात्रंदिवस सुरू आहे.

सध्या ठाणे ते वडपे दरम्यान चा प्रवास आव्हानात्मक बनला आहे. मात्र जेव्हा या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल तेव्हा ठाणे ते वडपे हा प्रवास वेगवान होणार असून यामुळे ठाणे ते नाशिक आणि ठाणे ते पुणे या दरम्यान ही प्रवाशांना वेगवान प्रवास करता येणार आहे.

साधारणता पुढील दहा-पंधरा दिवसात हे रुंदीकरणाचे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने दाखल होऊ शकणार आहे. त्यामुळे मुंबई, अहमदाबाद, नवी मुंबईतून माजिवडामार्गे नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे मात्र हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील कोंडीचा तिढा कायमचा सुटणार आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar