पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! हडपसर रेल्वे स्थानकावरून सुरू झाली नवीन रेल्वे गाडी, ‘या’ 23 स्थानकावर थांबणार

Tejas B Shelar
Published:
Pune Railway News

Pune Railway News : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता पुण्यातील नागरिकांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. दरवर्षी दिवाळीच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या वाढत असते.

विविध रेल्वे मार्गांवर धावणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते, रेल्वे गाड्या अगदीच हाउसफुल होऊन धावतात. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होतात. अनेकांना कन्फर्म तिकीट मिळत नाही.

त्यामुळे काही लोकांना इतर पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागतो. मात्र अशावेळी नागरिकांची प्रचंड हेळसांड होते आणि त्यांची आर्थिक पिळवणूक देखील केली जाते. दरम्यान प्रवाशांची हीच अडचण लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने पुणे शहरातील नागरिकांसाठी हडपसर स्थानकावरून विशेष रेल्वे सोडण्याचे नियोजन केले आहे.

हडपसर रेल्वे स्थानक ते हिसार रेल्वे स्थानक दरम्यान ही विशेष गाडी चालवली जाणार असून आज आपण याच विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणत्या 23 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसं राहणार Timetable?
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, हडपसर-हिसार विशेष रेल्वे (गाडी क्रमांक ०४७२४) ४ नोव्हेंबरला हडपसर येथून दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी सुटेल, दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजून ३० मिनिटांनी हिसारला पोहचणार आहे.

तसेच, हिसार-हडपसर विशेष रेल्वे (गाडी क्रमांक ०४७२३) ३ नोव्हेंबरला पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी सुटेल, दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी हडपसरला पोहचणार आहे.

या Railway Station वर थांबा घेणार !
या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्याचा मोठा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण, वसई रोड, पालघर, वापी, सुरत, वडोदरा,

गोध्रा, रतलाम, नागदा, भवानी मंडी, कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा, जयपूर, रिंगस, सीकर, नवलगढ, चिरवा, लोहारू आणि सरदुलपूर इत्यादी महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe