स्पेशल

पुणे रिंग रोड संदर्भात मोठी अपडेट! ‘या’ 117 गावांचा विकास होणार, संपूर्ण गावांची यादी पहा एका क्लिकवर

Published by
Tejas B Shelar

Pune Ring Road News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी ही मोठी भीषण समस्या बनली आहे. मात्र, हीच भीषण समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ पुढे सरसावले असून राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पुणे रिंग रोड हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.

या प्रकल्पामुळे आगामी काळात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी नियंत्रणात येईल असा विश्वास तज्ञांकडून व्यक्त होत असून आता याच प्रकल्पासंदर्भात एक नवे अपडेट हाती आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मार्च 2025 पर्यंत या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीचे भूसंपादन पूर्ण केले जाईल आणि त्यानंतर या प्रकल्पाचे प्रत्यक्षात बांधकाम सुरू होणार आहे. बांधकाम सुरू झाल्यानंतर हा प्रकल्प अडीच वर्षात पूर्ण होईल असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या पुणे रिंग रोड लगत असणाऱ्या 117 गावांचा सुद्धा विकास केला जाणार आहे आणि या विकासाची जबाबदारी देखील राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सोपविण्यात आली आहे. यासाठी एमएसआरडीसी ला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमण्यात आले आहे.

यानुसार आता एमएसआरडीसी कडून या संबंधित 117 गावांचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे. येत्या आठ महिन्यात हा विकास आराखडा म्हणजेच डीपीआर तयार होईल अशी माहिती समोर येत आहे. रिंगरोडलगत दोन विकास केंद्रे प्रस्तावित असून ते सुद्धा एमएसआरडीसीकडून विकसित केले जाणार आहे.

आता जवळपास ६६८ चौ. किमी क्षेत्रासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून एमएसआरडीसी काम पाहणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या 117 गावांमधील बांधकाम परवानगीचे अधिकार देखील एमएसआरडीसीकडे देण्यात आले आहेत. दरम्यान आज आपण एम एस आर डी सी कोणत्या 117 गावांचा विकास करणार आहे ? याचाच आढावा आज आपण घेणार आहोत.

या गावांचा विकास केला जाईल

मुळशी तालुक्यातील मुठा, बोतरवाडी, आंदगाव, खारावडे, साईव खुर्द, काटवडी, डावजे, माळेगाव, वाजले, वातुंडे, जातेडे, चिंचवड, कोंदूर, चिखली बुद्रुक, बेलावडे, दरवळी, भरेकरवाडी, मोरेवाडी, विठ्ठलवाडी, टेमघर, खेचरे, मारणेवाडी, कोंढवले या गावांचा विकास केला जाणार आहे.

वेल्हे तालुक्यातील वरसगाव, कुरण बुद्रुक, मोसे बुद्रुक, साईव बुद्रुक, ओसाडे, निगडे मोसे या रिंग रोड लगत गावांचा देखील विकास होणार आहे.

पुरंदर तालुक्यातील कोडित खुर्द, पूर, पोखर, वारवाडी, कुंभोशी, सोमुडर्डी, घेरापुरंदर, सुपे खुर्द, मिसळवाडी, थापेवाडी, भिवरी, भिवडी, बहीरवाडी, भोपगाव, पाथरवाडी, पिंपळे, पानवडी, हिवरे, कोडित बुद्रुक, अस्करवाडी, चांबळी, बोरहळेवाडी, गारडे या गावांचा देखील विकास आराखडा प्रस्तावित करण्यात आला आहे.

हवेली तालुक्यातील गोगलवाडी, माळखेड, मांडवी खुर्द, मांडवी बुद्रुक, खडकवाडी, माणेरवाडी, खानापूर, थोपटेवाडी, गोरे खुर्द, गोरे बुद्रुक, आगळंबे, जांभळी, भगतवाडी, घेरा सिंहगड, डोणजे, वांजळेवाडी, खाडेवाडी, बहुली, सोनापूर, वरदाडे, संभारेवाडी, खामगाव मावळ, मोगरवाडी, कुडजे, मोकरवाडी या गावातील विकास आराखडा देखील प्रस्तावित आहे.

भोर तालुक्यातील भांबवडे, भोंगवली, धनगवाडी, गुणंद, केंजळ, खडकी, मोरवाडी, न्हावी, निगडे, पांदे, पांजळवाडी, राजापूर, सांगवी खुर्द, सारोळे, सवर्डर, तपरेवाडी, उंबरे, वाठार खुर्द, वाघजवाडी, देगाव, दिडघर, जांभळी, कंबारे, कंजाळे, करांदी, केटकवणे, खोपे, कोळवाडी, कुरुंगवाडी, कुसगाव, माळेगाव, पर्वडी, रांजे, सालवडे, सांगवी बुद्रुक, सोनवाडी, विरवाडी या गावांचा विकास आराखडा देखील प्रस्तावित करण्यात आला आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar