स्पेशल

पुणे, सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी; पुणे-सातारा हायवेमधील रखडलेले काम ‘या’ महिन्यात होणार पूर्ण, NHI ने थेट तारीखच सांगितली

Pune-Satara Highway : पुणे सातारा महामार्गाचे काम 2010 मध्ये सुरू करण्यात आले. या महामार्गाचे काम बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला देण्यात आले. हा महामार्ग मात्र तीन वर्षात बांधून पूर्ण करण्याचा रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात झाला. म्हणजेच या महामार्गाचे काम 2013 मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र आता 2023 उलटून चाललाय तरी देखील या मार्गाचे काम पूर्ण झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार या मार्गाचे काम 98 टक्के पूर्ण झाले असून अजूनही या मार्गातील काही किरकोळ कामे प्रलंबित आहेत. टोलची वसुली मात्र गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. यामुळे प्रवाशांकडून या मार्गाचे रखडलेले काम नेमके केव्हा होणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत मात्र NHI कडून कोणतीच माहिती दिली जात नाही. वास्तविक हा महामार्ग केवळ पुणे आणि सातारा यांना जोडणारा महामार्ग नाही तर यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; भोगवटदार वर्ग 2 जमिनी वर्ग 1, NA करण्याची नामी संधी; खर्च लागणार मात्र…

परंतु या महामार्गाचे काम अद्याप पूर्णपणे झालेली नाही. अजूनही दोन ते तीन टक्के काम या मार्गाचे शेष आहे. यामुळे उर्वरित काम केव्हा होईल हा मोठा प्रश्न आहे. हा सहा पदरी महामार्ग असला तरीही अनेक ठिकाणी सहा पदरी काम झालेले नाही. मात्र टोल आकारताना संपूर्ण टोल प्रवाशांकडून घेतला जात आहे. शिवाय या महामार्ग अंतर्गत अनेक ठिकाणी सेवा रस्त्यांचे कामे बाकी आहेत.

सर्विस रोड व्यतिरिक्त अनेक ठिकाणी उड्डाणं पुलांचे काम देखील बाकी आहे, तर काही उड्डाणपूल सुरू झालेले नाहीत. याव्यतिरिक्त स्वच्छतागृहे, पथदिवे तसेच प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या अनेक सोयीसुविधा या महामार्गावर अद्याप चालू झालेल्या नाहीत. विशेष म्हणजे महामार्गाचे काम जलद गतीने होत नसल्याने पुणे सातारा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या महामार्गावर वेगवेगळ्या अडचणींचा तसेच अपघातांचा सामना करावा लागत आहे.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! 8 वी पास तरुणांना एसटी महामंडळात नोकरीची संधी; जाहिरात पहा अन आजच अर्ज करा

तरीदेखील संबंधित कंपनीवर कोणतीच कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये आणि प्रवाशांमध्ये शासनाविरोधात रोष वाढत आहे. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून आत्तापर्यंत ९८ टक्के काम झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. उर्वरित कामे ही लवकरच पूर्ण केले जातील आणि संपूर्ण महामार्गाचा लाभ प्रवाशांना मिळेल असा दावा या निमित्ताने केला जात आहे.

एकंदरीत सरकारी काम आणि दहा वर्षे थांब अशी गत या मार्गाची झाली आहे. दरम्यान प्रवाशांनी लवकरच उर्वरित रखडलेली कामे पूर्ण केली गेली पाहिजेत अशी मागणी केली आहे. NHI मात्र येत्या काही महिन्यात उर्वरित कामे केले जातील असा दावा करत आहे. यामुळे नेमका हा मार्ग केव्हा पूर्णपणे सुरू होईल याकडे प्रवाशांचे लक्ष लागून आहे.

हे पण वाचा :- खुशखबर! ‘या’ 1 लाख 77 हजार शेतकऱ्यांना मिळाली राज्य शासनाकडून 629 कोटीची मदत; तुम्हाला मिळणार की नाही, पहा….

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts