स्पेशल

पुण्याच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! अर्धा एकरात ‘या’ फळपिकाची शेती सुरु केली, अन मिळवलं तब्बल 11 लाखांचं उत्पन्न, वाचा ही यशोगाथा

Published by
Ajay Patil

Pune Successful Farmer : राज्यात गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांनी पारंपारिक पीक पद्धतीला बगल देत नवनवीन नगदी आणि फळबाग पिकांची शेती सुरू केली आहे. यातून शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील आता होऊ लागली आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात फळबाग लागवड अलीकडे वाढले आहे. पश्चिम महाराष्ट्रात जलसंधारणाची कामे वेगाने झाली असल्याने तसेच पाण्याची शाश्वत उपलब्धता असल्याने फळबाग लागवड वाढत असल्याचे मत तज्ञ व्यक्त करत आहेत.

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील आता फळबाग पिकांच्या शेतीत चांगली कामगिरी करून दाखवली आहे. दरम्यान जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याच्या दिवे परिसरात एका प्रयोगशील शेतकऱ्याने मात्र अर्धा एकर शेत जमिनीत अंजीर पिकाच्या लागवडीतून तब्बल अकरा लाखांची कमाई करून दाखवली आहे. खरं पाहता पुरंदर तालुका हा अंजीर उत्पादनासाठी संपूर्ण जगात ख्याती प्राप्त आहे.

हे पण वाचा :- बातमी कामाची ! कमी व्याजदरात कर्ज हवे आहे का? मग करा हे एक काम, स्वस्तात अन तात्काळ Loan मिळणार

येथील हवामान या पिकासाठी विशेष मानवत असल्याने शेतकऱ्यांना या पिकाची लागवड हा फायद्याचा सौदा सिद्ध होत आहे. दिवे परिसरातील जाधव वाडी येथील सुनील जाधव यांनी देखील अंजीर पिकाला परिसरातील हवामान पोषक असल्याने अंजीर ची लागवड केली आहे. त्यांनी आपल्या 24 गुंठे शेतजमिनीत याच्या 81 रोपांची लागवड केली आहे.

लागवडीपूर्व जमिनीची मशागत केली, मग जेसीबीच्या साह्याने खड्डे खोदले यानंतर शेणखत आणि बुरशीनाशकाचा वापर करून रोपांची लागवड करण्यात आली. लागवड केल्यानंतर शेणखत आणि कोंबडी खताचा अन रासायनिक खतांचा संतुलित प्रमाणात वापर करण्यात आला.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! ‘या’ महिन्यात होणार 30 हजार शिक्षकांची भरती; दीपक केसरकर यांची माहिती

योग्य पद्धतीने पिकासाठी पाणी व्यवस्थापन करण्यात आले. याचा परिणाम म्हणून या पिकातून मात्र दोन वर्षात त्यांना उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत त्यांना यातून जवळपास 12 ते 13 टन उत्पादन मिळाले आहे. बाजारपेठेत त्यांनी उत्पादित केलेल्या अंजीराला चांगला भाव मिळत आहे. सुनील यांनी दिलेल्या माहितीनुसार 48 अंजिराच्या एका पेटीला चारशे रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे.

हेच कारण आहे की त्यांना 24 गुंठ्यात 11 लाखाची कमाई झाली आहे. एकंदरीत हवामानाचा अभ्यास करून शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल घडवून आणला तर निश्चितच शेती ही लाखो रुपयांच्या उत्पन्नाचे साधन बनू शकते हेच या प्रयोगातून सिद्ध होत आहे.

हे पण वाचा :- महिलांना तिकीट दरात 50% सवलतीच्या योजनेबाबत मोठी बातमी ! ‘या’ दिवसापासून सुरु होणार अंमलबजावणी?, पहा

Ajay Patil