स्पेशल

सोने पे सुहागा ! भारतातील सर्वात खोल भूमिगत मेट्रो स्थानक महाराष्ट्रात ; 108 फुट खोल, कोट्यावधीचा खर्च, पहा डिटेल्स

Published by
Ajay Patil

Pune Underground Metro Railway : सध्या राज्यात दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. याच अनुषंगाने वेगवेगळे महामार्गांची, रेल्वे मार्गांची, रेल्वे स्थानकाची कामे हाती घेण्यात आली आहेत. राज्यात सध्या सागरी पूल, भूमिगत मार्ग, कोस्टल रोड डबल डेकर पूल यांसारखी कामे सुरू असतानाच आता भूमिगत मेट्रो स्थानकाच काम महाराष्ट्रात हाती घेण्यात आला आहे.

विशेष म्हणजे पुण्यामध्ये उभारला जाणारा भूमिगत मेट्रो स्थानक हे देशातील सर्वात खोल भूमिगत स्थानक राहणार असल्याचा दावा केला गेला आहे. यामुळे सध्या या मेट्रो स्थानकाची संपूर्ण भारतभर चर्चा रंगली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिकांना एकत्र जोडणारे शिवाजीनगर भूमिगत स्थानकाची कामे वेगाने सुरू आहेत.

पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील वर नमूद केलेल्या दोन मेट्रो मार्गिकांदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना यामुळे बेनिफिट मिळणार आहे. या भूमिगत स्थानकाबद्दल जर बोलायचं झालं तर याची खोली जमिनीच्या १०८ फूट खाली (३३.१ मीटर) एवढी आहे, यामुळे हे स्थानक देशातील सर्वाधिक खोल भूमिगत स्थानक ठरले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हे शिवाजीनगर भूमिगत स्थानक मध्यवर्ती मेट्रो स्थानक सिद्ध होणार आहे. दरम्यान याची खोली ही ३३.१ (१०८.५९ फूट) एवढी राहणार आहे. या भूमिगत स्थानकाचे छत ९५ फूट उंच असून तेथे थेट सूर्यप्रकाश किंवा नैसर्गिक प्रकाश पडेल, अशी व्यवस्था देखील करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. निश्चितच या मेट्रोस्थानाकामध्ये हायटेक तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे.

या प्रकारचे वैशिष्ट्य असलेले हे देशातील एकमेव स्थानक असल्याचा दावा देखील जाणकार ठोकत आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की यामध्ये मध्यवर्ती मेट्रो स्थानकात डेंगळे पूल, कामगार पुतळा आणि पुणे जिल्हा सत्र न्यायालय या बाजूंनी येणाऱ्या प्रवाशांना येण्या-जाण्यासाठी पादचारी आणि अन्य वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी याव्यतिरिक्त शिवाजीगनर ते हिंजवडी ही मेट्रो मार्गिका देखील याच भूमिगत स्थानकाला जोडली जाणार असल्याची माहिती समोर आली असल्याने याला मध्यवर्ती मेट्रो स्थानकाचा दर्जा मिळणार आहे. या स्थानकाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यामध्ये आठ उदवाहक अर्थातच लिफ्ट आणि अठरा सरकते जिने बसविण्यात येणार आहेत.

दरम्यान, या मध्यवर्ती स्थानकाच्या एकूण परिसराचा जर विचार केला तर ११.१७ एकर क्षेत्र या स्थानकासाठी उपलब्ध आहे. तसेच या स्थानकामध्ये येण्या-जाण्यासाठी एकूण सात दरवाजे राहणार आहेत. यात पार्किंगची सुविधा करून देण्यात येणार आहे. ड्राॅप ॲण्ड गो साठी स्वतंत्र मार्गिका राहणार. तसेच मल्टी मोडल इंटिग्रेशनसाठी पीएमपीचा थांबाही येथे असणार आहे. सध्या या स्थानकाची कामे वेगाने सुरू आहे. दरम्यान येत्या काही दिवसांत ही सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण होणार असल्याचा दावा मेट्रो प्राधिकरणाकडून केला जात आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की शिवाजीनगर भूमिगत मेट्रो स्थानकात येणाऱ्या पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गांचे काम जलद गतीने केले जात आहे. विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड ते स्वारगेट दरम्यान उभारल्या जाणाऱ्या मेट्रोमार्गिकेत रेंज हिल्स ते स्वारगेट हा टप्पा भूमिगत मेट्रोमार्गचा राहणार आहे. निश्चितच या भूमिगत मेट्रो स्थानकामुळे पुण्याच्या वैभवात भर पडणार आहे तसेच यामुळे दळणवळण व्यवस्था सुरळीत आणि वेगवान होण्यास मदत होणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil