Mushroom Farming:- आयुष्यामध्ये जर तुम्हाला काही मिळवायचे असेल किंवा तुम्ही कुठलेही काम करत असाल व त्यामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर त्याकरिता तुमच्यामध्ये सगळ्यात अगोदर तीव्र इच्छाशक्ती असणे गरजेचे असते व मनामध्ये असलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी हवे असलेले कष्ट व त्यातील सातत्य तसेच कुठलीही परिस्थिती आली तरी न डगमगता त्या परिस्थितीतून मार्ग काढत यशाच्या दिशेने मार्गक्रमण करत राहणे खूप गरजेचे असते व तेव्हा कुठे व्यक्ती आयुष्यामध्ये यशस्वी होतो.
अगदी याच पद्धतीने जर पुण्याच्या रहिवासी असलेल्या तृप्ती धखाते यांचे उदाहरण घेतले तर ते नक्कीच इतरांना प्रेरणादायी असे आहे. आज त्यांची प्रामुख्याने ओळख एक व्यावसायिक महिला अशी असून ते मशरूमचे उत्पादन घेऊन त्या माध्यमातून लाखोत उत्पन्न मिळवत आहेत.
तृप्ती धकाते यांची यशोगाथा
किती धकाते या पुणे येथे रहिवासी असून यांचे शैक्षणिक पार्श्वभूमी देखील उज्वल अशी असून ते कॉलेजमध्ये असताना गोल्ड मेडलिस्ट आहेत. अभ्यासामध्ये प्रचंड हुशार असल्यामुळे ते एका कॉलेजमध्ये प्राध्यापक पदावर रुजू झाले व लाखो रुपयांचे पॅकेज त्यांना होते.
परंतु त्यांनी प्राध्यापकाची नोकरी सोडली व मशरूम शेती करायला सुरुवात केली. आता कुठलाही व्यवसाय म्हटला म्हणजे सुरुवातीला अगदी मोठ्या प्रमाणावर अडचणी येतात व तसेच अडचणी त्यांना मशरूम शेतीमध्ये सुरुवातीच्या कालावधीत आल्या. परंतु कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी या अडचणींवर मात केली व आज यशस्वी व्यावसायिक महिला होण्याचा प्रवास त्यांनी पूर्ण केला.
तृप्ती धकाते आज मशरूमच पिकवत नाही तर इतर लोकांना मशरूम लागवडीचे प्रशिक्षण देखील देतात. या व्यवसायात येण्याअगोदर त्यांनी नागपूर विद्यापीठातून वनस्पतीशास्त्रात एमएसस्सी पूर्ण केले व वनस्पतीशास्त्र देखील त्या सुवर्णपदक विजेते आहेत.
नंतर त्या महाविद्यालयांमध्ये प्राध्यापिका झाल्या व वर्धा येथील जेबी कॉलेज ऑफ सायन्स मध्ये त्या नोकरीला होता. त्यानंतर नोकरी सोडून त्या संभाजीनगरला आल्या व त्या ठिकाणी ॲग्रीजन बायोटेक मध्ये त्यांनी काम केले. या कालावधीमध्ये तृप्ती यांची मशरूम मध्ये आवड वाढली व त्यांनी मशरूम व संशोधन सुरू केले.
जेव्हा ते ॲग्रीजन बायोटेक मध्ये काम करत होत्या तेव्हा त्यांना मशरूमच्या अनेक वानांची महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. 2018 मध्ये तृप्ती यांनी मशरूमची शेती करण्याचा निर्णय घेतला व मशरूमची लागवड सुरू केली. याकरिता त्यांनी भाडेतत्त्वावर जमीन घेतली व त्यांच्या पतीची देखील या व्यवसायामध्ये तृप्ती यांना खूप मोठी मदत व पाठिंबा मिळाला.
सुरुवातीला त्यांनी मशरूमची उत्पादन तर घेतले. परंतु त्या मशरूमची विक्री करण्यामध्ये मात्र त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. कारण त्यांना मशरूमच्या मार्केट बद्दल काहीच माहिती नव्हती व मार्केटिंगच्या कोणतेही प्रशिक्षण त्यांनी घेतलेले नव्हते. परंतु हार न मानता त्यांनी मशरूम पिकवणे सुरूच ठेवले.
स्वतः पॅकेजिंग करून त्याच्या मार्केटिंगचे काम त्यांनी हाताळायला सुरुवात केली व ठीक ठिकाणी जाऊन लोकांना मशरूम बद्दल माहिती दिली. स्थानिक बाजारात जाऊन देखील लोकांना मशरूमचे मोफत सॅम्पल देखील दिले. अशाप्रकारे खूप कष्ट घेतले व त्यानंतर लोक हळूहळू मशरूमची खरेदी करायला लागले.
त्यानंतर आलेल्या कोरोनाच्या कालावधीत मात्र त्यांचे नशीब बदलले व लोक वनस्पतीवर आधारित भाज्या खायला प्राधान्य द्यायला लागले. शेवटी तृप्ती धकाते यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळायला लागले. लोक मोठ्या प्रमाणावर मशरूमची पॅकेट खरेदी करू लागले व आज तृप्ती ताईंनी पिकवलेल्या मशरूमची केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात निर्यात केली जाते.
महिन्याला होते चार लाखाची कमाई
तृप्ती धकाते या व्यवसायामध्ये खूप प्रचंड प्रमाणात मेहनत घेत होत्या व या व्यवसायात त्यांच्या पतीने तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. आज त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले असून त्यांचा व्यवसाय खूप झपाट्याने पसरला आहे. आज तृप्ती धकाते या मशरूमच्या शेतीतून दरमहा चार लाख रुपये कमवत आहेत.
आज त्या फक्त मशरूमचाच व्यवसाय करत नाही तर त्या लोकांना त्याबद्दल प्रशिक्षण देखील देत आहेत. आजपर्यंत त्यांनी कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्रांच्या माध्यमातून सात हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आहेत व इतर मशरूम लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्या मदत देखील करतात.