Punjab Dakh : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून सातत्याने हवामान बदलाचे विपरीत परिणाम भोगावे लागत आहेत. हवामानात सातत्याने बदल होत असून अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे बळीराजा अक्षरशः बेजार झाला आहे. यंदा देखील खरीप हंगामात शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे.
शिवाय रब्बी हंगामात देखील अवकाळी पावसामुळे आणि गारपटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या मार्च महिन्यात आणि या चालू एप्रिल महिन्यामध्ये अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. अशातच आता पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज समोर आला आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! तुरीच्या दरात विक्रमी वाढ ; आणखी ‘इतके’ वाढणार भाव, पहा काय म्हणताय जाणकार
एका यूट्यूब चैनल वर दिलेल्या माहितीनुसार पंजाब राव डख यांनी राज्यात 21 एप्रिल पासून म्हणजे आजपासून हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांनी 21 एप्रिल ते 28 एप्रिल पर्यंत राज्यात अवकाळी पावसाची शक्यता जाहीर केली आहे. विशेष म्हणजे 25 एप्रिल ते 27 एप्रिल पर्यंत म्हणजेच तीन दिवस राज्यातील काही भागात गारपीटीची देखील शक्यता राहणार आहे.
कोणत्या भागात गारपिट होईल याबाबत माहिती देण्यात आलेली नाही मात्र राज्यातील काही भागात तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता राहणार आहे. याशिवाय पुढल्या महिन्यात म्हणजेच मे महिन्यात देखील पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. पुढल्या महिन्यात पाच मे ते सात मे दरम्यान राज्यात पाऊस पडेल अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
हे पण वाचा :- शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; या लोकांना घर बांधण्यासाठी ‘इतकी’ ब्रास वाळू मिळणार फ्री, पहा…..
याशिवाय 15 मे च्या सुमारास देखील राज्यात पावसाची शक्यता कायम राहणार आहे. दरम्यान डख यांनी यंदाच्या मान्सून बाबत देखील मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या मते यंदाचा मान्सून हा समाधानकारक राहणार आहे. आठ जूनला मान्सूनचे आगमन होईल आणि जून अखेरपर्यंत राज्यात जवळपास सर्वत्र पाऊस पडणार आहे.
जुन अखेर पर्यंत शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या देखील होणार आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या जूनमध्ये होणार नाहीत त्यांच्या पेरण्या जुलै महिन्यात होतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. यंदाचा मान्सून हा गेल्या वर्षी प्रमाणेच म्हणजेच 2022 सारखाच जोरदार राहील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली असल्याने निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
हे पण वाचा :- समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरविरपर्यंतच्या 80 किलोमीटरचे काम पूर्ण; ‘या’ दिवशी खुला होणार हा मार्ग, पहा……