पंजाब नॅशनल बँकेच्या 399 दिवसांच्या एफडी योजनेत 5 लाख रुपये गुंतवले तर किती रिटर्न मिळणार ? एफडी करण्याआधी कॅल्क्युलेशन पहा

जर तुम्हीही फिक्स डिपॉझिटमधून अधिकचा परतावा मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी पंजाब नॅशनल बँकेचा पर्याय फायदेशीर ठरणार आहे. आज आपण पंजाब नॅशनल बँकेच्या 399 दिवसाच्या फिक्स डिपॉझिट योजनेमध्ये पैसे गुंतवल्यास ग्राहकांना किती परतावा मिळतो या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

Tejas B Shelar
Published:
Punjab National Bank FD Calculation

Punjab National Bank FD Calculation : जर तुमचाही येत्या काही दिवसात फिक्स डिपॉझिटमध्ये पैसा गुंतवण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच कामाची ठरणार आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा गुंतवणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचे कारण म्हणजे फिक्स डिपॉझिट करणाऱ्यांना बँकांच्या माध्यमातून आता चांगला परतावा दिला जात आहे.

याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवलेला पैसा कधीच वाया जात नाही. यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणात फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा गुंतवण्याला प्राधान्य दाखवत आहेत.

दरम्यान, जर तुम्हीही फिक्स डिपॉझिटमधून अधिकचा परतावा मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी पंजाब नॅशनल बँकेचा पर्याय फायदेशीर ठरणार आहे. आज आपण पंजाब नॅशनल बँकेच्या 399 दिवसाच्या फिक्स डिपॉझिट योजनेमध्ये पैसे गुंतवल्यास ग्राहकांना किती परतावा मिळतो या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

कशी आहे पंजाब नॅशनल बँकेची 399 दिवसांची एफडी योजना?

पंजाब नॅशनल बँक ही एक सरकारी बँक आहे. देशात एकूण 12 सरकारी बँका असून यामध्ये पंजाब नॅशनल बँकेचा देखील समावेश होतो. या बँकेकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी वर 3.50% पासून ते 7.25% पर्यंतचे व्याज ऑफर केले जात आहे. पंजाब नॅशनल बँक चारशे दिवसांच्या कालावधीच्या एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करते.

पीएनबीच्या चारशे दिवसांच्या एफडी योजनेत गुंतवणूक केल्यास सामान्य ग्राहकांना 7.25% व्याजदराने परतावा दिला जात आहे. तसेच ही बँक 399 दिवसांच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 6.80% आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.30% या दराने व्याज ऑफर करत आहे.

म्हणजेच सामान्य ग्राहकांच्या तुलनेत देशातील आघाडीची सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 0.50 टक्क्यांचे अधिकचे व्याजदर ऑफर करते. अशा परिस्थितीत, आता आपण 399 दिवसांच्या एफडी योजनेत जर पाच लाख रुपये गुंतवले तर किती रिटर्न मिळणार याचे संपूर्ण कॅल्क्युलेशन पाहणार आहोत.

5 लाख रुपये गुंतवले तर किती रिटर्न मिळणार?

पीएनबीच्या 399 दिवसांच्या एफडी योजनेत जर एखाद्या सामान्य ग्राहकाने पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला मॅच्युरिटी वर 5 लाख 34 हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच सदर ग्राहकाला व्याज म्हणून 34 हजार रुपये मिळणार आहेत.

जर समजा याच कालावधीच्या एफडी योजनेत एखाद्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकाने पाच लाख रुपये गुंतवले तर त्याला पाच लाख 36 हजार 500 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच सदर ग्राहकाला व्याज म्हणून 36 हजार पाचशे रुपये मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe