अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 (Entertainment news ):- शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यानंतर अद्याप सार्वजनिकरित्या दिसलेले नाही. शिल्पा शेट्टीला शूटिंग सेटपासून इव्हेंटपर्यंत सतत स्पॉट केले जाते.
आता राज कुंद्रानी त्यांचे सोशल मीडिया अकाउंट डिलीट केल्याचे कळते आहे. अटक होण्यापूर्वी राज कुंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय होते आणि त्यांचे मजेदार व्हिडिओ पोस्ट करत असायचे.
अनेक वेळा या व्हिडिओंमध्ये शिल्पाही त्याच्यासोबत दिसल्या होत्या, मात्र आता राज कुंद्रानी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. सुटका झाल्यानंतर राज कुंद्रानी सोशल मीडिया व लोकांच्या नजरेपासून दूर राहत आहेत.
तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर राज कुंद्राचे अधिकृत पेज उघडल्यावर ते पेज दिसत नाही. राज कुंद्रा याना पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आली होती. सुमारे दोन महिने ते तुरुंगात होते.
नंतर त्यांना कोर्टातून जामीन मिळाला. राज कुंद्रा आजही मीडियाच्या नजरेपासून दूर आहेत. मात्र यापूर्वी शिल्पा शेट्टी करवा चौथ साजरी करण्यासाठी मुलांसोबत अलिबागला रवाना झाल्या होत्या.
नुकताच शिल्पा शेट्टीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात त्या स्ट्रीट डॉगसोबत दिसल्या होत्या.
हा व्हिडिओ पापाराझी फोटोग्राफर विरल भयानी यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओवर अनेक यूजर्सनी राज कुंद्राचे नाव घेऊन शिल्पाला ट्रोल करण्यास सुरुवात केली.