स्पेशल

फेमस युट्यूबर रणवीर अलाहाबादिया अन त्याची गर्लफ्रेंड थोडक्यात बचावले ! गोव्याच्या समुद्रात बुडता-बुडता वाचले, रणवीरने स्वतःचं सांगितला घटनेचा थरार

Published by
Tejas B Shelar

Ranveer Alahbadiya : फेमस युट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि त्याची गर्लफ्रेंड यांच्यासोबत गोव्यात एक विचित्र अन अतिशय धक्कादायक घटना घडलीय. हे दोघेही जण गोव्याच्या समुद्रात बुडता-बुडता थोडक्यात वाचलेत. खरे तर, सध्या संपूर्ण देशभर नाताळची धूम आहे.

नाताळ सेलिब्रेट करण्यासाठी अनेक जण गोव्याला जात आहेत. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण आपल्या परिवारासमवेत तसेच मित्रांसमवेत गोव्याला फिरायला जात आहेत. फेमस युट्युबरं रणवीर अलाहाबादिया देखील आपल्या गर्लफ्रेंड सोबत गोव्याला गेलायं.

मात्र या गोव्याच्या ट्रिपमध्ये यां जोडप्या सोबत एक वाईट घटना घडलीय. समुद्रात पोहताना रणवीर आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा जीव धोक्यात आला होता, हे जोडपं अगदीच थोडक्यात बचावल आहे.

स्वतः रणवीर याने आपल्या instagram पोस्टवर या घटनेचा थरार सांगितला आहे. रणवीर याने म्हटल्याप्रमाणे त्याला आणि त्याच्या गर्लफ्रेंडला एका आयपीएस अधिकाऱ्याच्या कुटुंबाने समुद्रात बुडण्यापासून वाचवले आहे.

काय म्हटला रणवीर?

रणवीरने आपल्या पोस्टमध्ये असं लिहलंय की, ‘हा माझ्या आयुष्यातील सर्वांत इव्हेंटफुल ख्रिसमस होता. आता आम्ही एकदम ठीक आहोत. मात्र काल संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास मी आणि माझी गर्लफ्रेंड एका विचित्र घटनेतून वाचलो. आम्हा दोघांनाही खुल्या समुद्रात पोहायला खूप आवडतं.

मला लहानपणापासून समुद्रात पोहोण्याचा अनुभव आहे. मात्र काल पोहताना आम्ही अचानक पाण्याखालील प्रवाहामुळे बुडू लागलो. माझ्यासोबत असं पहिल्यांदाच घडलं. अशा घटनेत एकट्याने पोहत बाहेर येणं सोपं असतं. पण स्वत:सोबत दुसऱ्या व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढणं खूप कठीण होतं.

पाच-दहा मिनिटं प्रयत्न केल्यानंतर आम्ही मदतीसाठी हाक मारली. तेव्हा आमच्याजवळच असलेल्या पाच लोकांच्या एका कुटुंबाने आम्हाला बुडण्यापासून वाचवलं. आम्ही दोघं खूप चांगले स्विमर आहोत, पण कधी कधी तुमची परीक्षा घेतली जाते. माझ्या नाकातोंडात पाणी जाऊ लागलं होतं,

तेव्हा आम्ही मदतीसाठी ओरडू लागलो. यादरम्यान आयपीएस अधिकारी आणि त्यांची पत्नी आयआरएस अधिकारी यांनी आमचे प्राण वाचवले. या घटनेनंतर आम्ही सुन्न झालो होतो. त्या संपूर्ण घटनेदरम्यान देव आमची सुरक्षा करत होता, अशी जाणीव झाली. आमचा जीव वाचवल्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त केली. या एका घटनेमुळे माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला.’

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com