Ration Card News : रेशन कार्ड धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी हाती आली आहे. जर तुम्हीही सरकारकडून दिल्या जाणाऱ्या रास्त भावातील राशनचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
खरे तर सरकारने धान्य वितरणाच्या नियमांमध्ये बदल केला आहे. गहू आणि तांदूळ वितरणाच्या नियमांमध्ये सरकारने बदल केला असून हे नवीन बदल एक नोव्हेंबर 2024 पासून लागू राहणार असल्याची माहिती केंद्रातील मोदी सरकारने दिली आहे.
दरम्यान आज आपण धान्य वितरणाच्या या नवीन नियमावली संदर्भात सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय आहेत नवीन नियम
धान्य वाटपाच्या या नव्या नियमानुसार आता गहू आणि तांदूळ समसमान मिळणार आहेत. म्हणजेच जेवढा गहू मिळणार तेवढाच तांदूळ मिळणार आहे. आतापर्यंत गव्हाच्या तुलनेत तांदळाचे प्रमाण अधिक राहत होते.
मात्र आता गव्हाचे प्रमाण वाढवले जाणार आहे आणि तांदळाचे प्रमाण कमी केले जाणार आहे. आधी सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डमध्ये समाविष्ट असणाऱ्या एका सदस्याला तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू म्हणजेच रेशन कार्ड मधील एका व्यक्तीला पाच किलो धान्य मिळत होते.
पण आता एक नोव्हेंबर पासून यामध्ये बदल झाला असून एका सदस्याला अडीच किलो तांदूळ आणि अडीच किलो गहू मिळणार आहे. म्हणजे तांदळाचे प्रमाण 1/2 kg ने कमी होणार आहे आणि गव्हाचे प्रमाण अर्धा किलो ने वाढणार आहे.
यामुळे मात्र सर्वसामान्य गोरगरीब जनतेला फायदा होण्याची आशा आहे. खरे तर ग्रामीण भागात सर्वसामान्य गोरगरीब जनता गव्हाच्या चपात्या अधिक प्रमाणात खात असते.
यामुळे जर गव्हाचे प्रमाण वाढले तर साहजिकच याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अंत्योदय रेशन कार्डधारकांना दिल्या जाणाऱ्या धान्य वाटपामध्ये देखील बदल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आता अंत्योदय रेशन कार्ड धारकांना देखील वाढीव गहू मिळणार आहे. आतापर्यंत अंत्योदय रेशन धारकांना 20 किलो तांदूळ आणि 14 किलो गहू दिला जात होता.
मात्र आता अंत्योदय रेशन धारकांना 18 किलो तांदूळ आणि 17 किलो गहू दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे रेशन धान्य वाटपात करण्यात आलेला हा बदल एक नोव्हेंबर 2024 पासून लागू झाला आहे. म्हणजे आता या महिन्याच्या राशनपासून हे नवीन नियम लागू राहणार आहेत.
नव्या नियमानुसार तांदळाचे प्रमाण घटणार आहे आणि गव्हाचे प्रमाण वाढणार आहे. तथापि एका व्यक्तीला मिळणाऱ्या धान्यात कोणताच बदल होणार नाहीये.
आधीप्रमाणेच पाच किलो धान्य एका व्यक्तीला दिले जाणार आहे. अंत्योदय रेशन कार्ड धारकांबाबत बोलायचं झालं तर अंत्योदय रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबाला 35 किलो धान्य मिळणार असून एक किलो साखर देखील दिली जाणार आहे.