Ration Card News : उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. आज संपूर्ण जगभरात थर्टी फर्स्ट ची धूम पाहायला मिळत आहे. अनेकजण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडत आहेत. दरम्यान, नवीन वर्षाच्या आधीच रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. खरे तर, नवीन वर्षात अनेक नियम बदलणार आहेत.
रेशन कार्ड च्या संदर्भातील नियम देखील नवीन वर्षात चेंज होणार आहे. शासकीय आकडेवारीनुसार देशातील जवळपास 80 कोटी कुटुंबांकडे रेशन कार्ड आहे. हे 80 कोटी कुटुंब रेशन कार्ड वर दिल्या जाणाऱ्या धान्याचा लाभ घेत आहेत.
सरकारकडून रेशन कार्ड धारकांना स्वस्त दरात रेशन दिले जाते. रेशनमध्ये गहू तांदूळ बाजरी ज्वारी अशा धान्यांचा समावेश असतो. ज्या लोकांकडे अंत्योदय रेशन कार्ड आहे त्यांना साखर सुद्धा मिळते. आधी रेशन कार्ड धारकांना केरोसीन म्हणजेच रॉकेलही दिले जात होते.
मात्र गेल्या काही वर्षांपासून एलपीजीचा वापर वाढला असल्याने केरोसीन देणे बंद करण्यात आले आहे. रेशन कार्डधारकांना कोरोना काळापासून मोफत धान्य उपलब्ध करून दिले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे या योजनेला सरकारने मुदतवाढ देखील दिली आहे. दरम्यान, जर तुम्हीही मोफत रेशनचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
नवीन वर्षात काही रेशन कार्ड धारकांचे रेशन कार्ड बंद केले जाणार आहे. सरकारने यासाठी नवीन नियम तयार केले आहेत. नव्या नियमानुसार, नवीन वर्षात म्हणजे 2025 मध्ये काही रेशन कार्ड रद्द केले जाणार आहेत. सरकारने आता रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करणे अनिवार्य असल्याचे सांगितले आहे.
ज्या नागरिकांनी ई-केवायसी केलेली नाही त्यांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते. रेशन कार्ड केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२४ आहे. त्यामुळे तोपर्यंत तुम्हाला ई-केवायसी करायची आहे. जर आज तुम्ही केव्हायसी ची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमच रेशन कार्ड बंद होणार आहे.
जे लोक दिलेल्या मुदतीत रेशन कार्ड ची केवायसी करणार नाहीत त्यांचे रेशन कार्ड एक जानेवारी 2025 पासून रद्द होणार असल्याची माहिती समोर येत आहे. रेशन कार्ड ची केवायसी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील स्वस्त धान्य दुकानात म्हणजेच रेशन दुकानात जावे लागणार आहे. रेशन दुकानात गेल्यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड द्यावे लागेल.
कुटुंबात जेवढे सदस्य आहेत म्हणजेच रेशन कार्ड मध्ये ज्या सदस्यांची नावे आहेत त्या सर्वांचे आधार कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागणार आहेत. त्यानंतर पोओएस मशीनवर फिंगरप्रिंट टाकावे लागेल. अशा तऱ्हेने तुम्ही केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करू शकता.