Ration Shop News : शासनाच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना स्वस्त दरात गहू तांदूळ सारखे अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाते. यासाठी शासनमान्य रेशन दुकान सूरू आहेत. या रेशन दुकानात रेशन कार्ड धारकांना स्वस्त दरात गहू, तांदूळ, साखर मिळते. विशेष बाब अशी की कोरोना काळापासून शिधापत्रिका धारकांना शासनाच्या माध्यमातून मोफत अन्नधान्य पुरवले जात आहे.
दरम्यान आज आपण रेशन दुकान सुरू करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात आणि यासाठी पात्रता काय आहेत? याविषयी थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरे तर अनेकांच्या माध्यमातून रेशन दुकान सुरू करण्याबाबत विचारणा केली जात होती.
रेशन दुकान कसे सुरु केले जाते, त्यासाठी पात्रता यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात रेशन दुकान सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या परवान्यासाठी अर्ज कसा करावा असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या माध्यमातून उपस्थित होत होते. दरम्यान आज आपण याच प्रश्नांची सविस्तर उत्तरे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
रेशन दुकान सुरू करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात?
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार रेशन दुकान सुरू करण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यात आधार कार्ड, घर टॅक्स पावती/सातबारा/मालकी पत्र, गटाचे वार्षिक लेखे तपासणी केल्याचा अहवाल, ग्राम सभेचा ठराव दुकान मागणी पत्र, गट स्थापन केल्याचे नोंदणी पत्र, गुन्हा दाखल नसल्या बाबत शपथपत्र इत्यादी कागदपत्रांचा समावेश होतो.
मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की कागद पत्रांमध्ये तुमच्या जिल्हा नुसार बदल होऊ शकतो. त्यामुळे कागदपत्रांविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी एकदा पुरवठा विभागाला नक्कीच भेट दिली पाहिजे.
रेशन दुकान सुरू करण्यासाठीच्या पात्रता कोणत्या
अर्जदार हा भारताचा निवासी असणे म्हणजेच भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. रेशन दुकान सुरू करण्यासाठी अर्जदार किमान दहावी पास असणे ही शैक्षणिक अट घालून देण्यात आली आहे. ज्या भागात शॉप सुरु करण्यासाठी रिक्त पद सूचित केले आहे त्या भागातील रहिवाशांनाच फक्त रेशन दुकानासाठी अर्ज करता येतो.
म्हणजे ज्या ठिकाणी रेशन दुकानाची जागा रिक्त आहे तेथील रहिवाशांनाच तिथे रेशन शॉप सुरू करता येऊ शकते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे रेशन दुकान संबंधित पुस्तके आणि खात्याची देखभाल करण्यास सक्षम असणाऱ्या लोकांनाच रेशन दुकानासाठी अर्ज करता येतो.
रिक्त स्थानाची अधिसूचना ज्या जागेवर आहे त्या जागेवर अर्जदारास वैध अधिकार असायला हवा ही देखील महत्त्वाची अट यामध्ये आहे. राशन दुकान आवारात 15 फुटांचा रस्ता आणि मध्यभागी नागरिक प्रवेश घेऊ शकतील एवढी जागा असणे आवश्यक आहे. सदर प्रस्तावित आवार 5 मीटर लांबीचा आणि 3 मीटर रुंदी आणि 3 मीटर उंचीवर असणे अनिवार्य असल्याची माहिती हाती आली आहे.
रेशन दुकान परवान्यासाठी अर्ज कुठे करावा लागणार
तुम्हाला रेशन दुकान सुरू करायचे असेल तर यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट द्यावी लागणार आहे. तिथे नवीन राशन दुकान परवानाचा अर्ज घ्यावा लागेल.
जर तुम्हाला राशन दुकान परवाना अर्ज ऑनलाइन पद्धतीने मिळवायचा असेल तर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतात त्या जिल्ह्याच्या ऑफिसियल वेबसाइट वर भेट देऊन तो अर्ज डाउनलोड करु शकता.
विहित नमुन्यातील अर्ज तुमच्याकडे आला की तुम्ही तो अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे. अर्जामध्ये कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही याची काळजी अर्जदाराला घ्यायची आहे.
अर्जामध्ये काहीही चूक आढळली तरी देखील तो अर्ज भेटायला जाऊ शकतो. यामुळे अर्ज काळजीपूर्वक भरा आणि अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे व्यवस्थित रित्या जोडून तो अर्ज संबंधित विभागात जमा करा. यानंतर तुमच्या अर्जावर पुढील प्रक्रिया सुरू होईल.