काल अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला व यामध्ये महिला तसेच मुली, शेतकरी आणि इतर अनेक योजनांच्या संबंधित घोषणा केल्या. या सगळ्या अर्थसंकल्पामध्ये महत्वाची घोषणा ठरली ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही होय.26 जानेवारी 2023 पासून मध्य प्रदेश राज्यांमध्ये लाडली बहन योजना सुरू करण्यात आलेली होती व यामध्ये त्या ठिकाणी प्रति महिना महिलांना एक हजार रुपये मिळतात व ही योजना संपूर्ण देशामध्ये खूप चर्चेला आली.
याच योजनेच्या धर्तीवर आता महाराष्ट्र सरकारने देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली असून याकरिता 46 हजार कोटींचा निधी अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत महिलांना शासनामार्फत प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. साधारणपणे या योजनेची अंमलबजावणीला जुलै 2024 पासून सुरुवात होणार असल्याचे म्हटले गेले आहे. त्यामुळे या लेखात आपण या योजनेबद्दलचे संपूर्ण माहिती बघू.
कोणत्या महिलांना मिळेल
या योजनेचा लाभ?1- सगळ्यात महत्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलाही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे.
2- राज्यातील घटस्फोटीत, विवाहित, परित्यक्त आणि निराधार महिला पात्र असणार आहे.
3- या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित महिलांचे वय हे किमान 21 वर्षे पूर्ण आणि कमाल वयाचे साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत असणे आवश्यक आहे.
4- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे गरजेचे आहे.
5- तसेच लाभार्थी कुटुंबाचे सगळे मिळून वार्षिक उत्पन्न 2,50000 लाखपेक्षा जास्त नसावे.
कोणत्या महिलांना मिळणार नाही या योजनेचा लाभ?
1- ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
2- ज्या कुटुंबातील एखादा सदस्य इन्कम टॅक्स पेयर म्हणजेच आयकर दाता आहे.
3- तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/ कायम/ कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/ सरकारी उपक्रम/ मंडळ/ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. मात्र यामध्ये बाह्य यंत्रणा द्वारे काम करत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
4- तसेच सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागाच्या माध्यमातून ज्या काही योजना राबविण्यात येतात त्या माध्यमातून रुपये पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेतला असेल
5- ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत.
6- ज्या लाभार्थीच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारचे एखादी बोर्ड / कार्पोरेशन तसेच उपक्रमाचे अध्यक्ष / उपाध्यक्ष/ सदस्य/ संचालक आहेत.
7- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर एखाद्या कुटुंबातील सदस्यांचे संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन असेल तर ते देखील अपात्र ठरतील.
8- ज्यांच्याकडे चार चाकी वाहन ( ट्रॅक्टर वगळून) कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावावर रजिस्टर आहे. अशा महिला देखील अपात्र ठरतील.
कुठली कागदपत्रे लागतील?
यामध्ये या योजनेचा ऑनलाइन अर्ज, लाभार्थ्याच्या आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याच्या अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला कुटुंबप्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो तसेच रेशन कार्ड आणि या योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
अर्ज कुठे करता येईल?
या योजनेच्या अर्ज मुख्यत्वे करून मोबाईल ॲपच्या माध्यमातून, सेतू सुविधा केंद्रद्वारे किंवा पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन भरली जाऊ शकतात. यामध्ये महत्त्वाचे असे आहे की…
1- जर एखाद्या महिलेला ऑनलाइन अर्ज सादर करता येत नसेल तर त्यांच्या करिता अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय( नागरी/ ग्रामीण/ आदिवासी) तसेच ग्रामपंचायत/ वार्ड/ सेतू सुविधा केंद्र येथे सुविधा उपलब्ध असेल. अशा ठिकाणी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून भरलेला फॉर्म ऑनलाइन प्रविष्ट केला जाईल आणि अर्ज यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर लाभार्थ्यांना पोचपावती दिली जाईल. विशेष म्हणजे ही अर्ज करण्याची प्रक्रिया विनामूल्य आहे.
या योजनेच्या अर्ज भरण्यापासून तर पैसे खात्यात जमा होण्याच्या संभाव्य तारखा
1- या योजनेचा अर्ज एक जुलै 2024 पासून प्राप्त होतील.
2- या योजनेचा अर्ज मिळवण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 असेल.
3- त्यामध्ये तात्पुरती यादी 16 जुलै 2024 ला प्रकाशित करण्यात येईल.
4- प्रकाशित करण्यात आलेल्या तात्पुरत्या यादीवरील तक्रारी तसेच हरकती प्राप्त करण्याचा कालावधी हा 16 जुलै ते 20 जुलै 2024 पर्यंत असेल.
5- प्राप्त झालेल्या तक्रार किंवा हरकतींचे निराकरण करण्याचा कालावधी 21 जुलै ते 30 जुलै 2024 पर्यंत असेल.
6- त्यानंतर लाभार्थ्यांची अंतिम यादी एक ऑगस्ट 2024 ला प्रकाशित केली जाईल.
7- पात्र लाभार्थ्यांचे बँकेमध्ये 10 ऑगस्ट 2024 रोजी ई केवायसी करावी लागेल.
8- लाभार्थी निधी म्हणजेच पैशांचे हस्तांतरण 14 ऑगस्ट 2024 ला होईल.
9- त्यानंतर मात्र प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील.