स्पेशल

शैक्षणिक कामांकरिता आवश्यक कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांची होत आहे धावपळ; वाचा कोणत्या प्रमाणपत्रासाठी कोणती लागतील कागदपत्रे?

Published by
Ajay Patil

नुकत्याच काही दिवसां अगोदर दहावी आणि बारावीच्या निकाल जाहीर झाले व त्यानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी व पालकांची पुढील अभ्यासक्रमासाठी ऍडमिशन घेण्याकरिता धावपळ उडताना दिसून येत आहे. परंतु जेव्हाही आपण महाविद्यालय किंवा इतर कोर्सेस ना  ऍडमिशन घेतो तेव्हा आपल्याला बऱ्याच प्रकारच्या इतर कागदपत्रांची देखील आवश्यकता भासताना दिसून येते व याकरिता तालुकास्तरावरील तहसील कार्यालयात असणाऱ्या सेतू सुविधा केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते.

परंतु बऱ्याचदा लागणाऱ्या महत्त्वाच्या प्रमाणपत्रांसाठी इतर काही कागदपत्रांची आवश्यकता असते व अशा कागदपत्रांची पूर्तता न करता आल्याने बऱ्याचदा प्रमाणपत्रासाठी केलेला अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता असते व पुढे खूप मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

शैक्षणिक कामांकरिता महत्त्वाच्या असलेल्या या प्रमाणपत्रांमध्ये प्रामुख्याने जातीचा दाखला तसेच वय अधिवास प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र यासारख्या इतर कागदपत्रांची आवश्यकता भासते व या प्रमाणपत्रांसाठी इतर काही कागदपत्रे लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची वेळेला धावपळ होऊ नये म्हणून या लेखात आपण कोणत्या प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात याबाबतचे महत्त्वपूर्ण माहिती बघू.

 कोणत्या प्रमाणपत्रासाठी कुठली कागदपत्रे लागतात?

1- जातीचा दाखला म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट ऍडमिशन घेताना जातीचा दाखला म्हणजेच जात प्रमाणपत्र खूप आवश्यक असते व जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना विद्यार्थ्याकडे टीसी, बोनाफाईड सर्टिफिकेट(4,10 आणि 12), जन्म प्रमाणपत्र, वडिलांचा टीसी तसेच वडिल अशिक्षित असल्यास तसा दाखला किंवा वडिलांचा रहिवासी दाखला( कोणतेही एक),

शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड, सातबारा उतारा व गाव नमुना-8, पाच नातेवाईकांची जातीचे प्रमाणपत्र, वंशावळ, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, जातीची नोंद असल्याचा पुरावा( अनुसूचित जाती आणि जमातींसाठी 1950 पूर्वीचा, ओबीसी प्रवर्गाकरिता 1967 पूर्वीचा तर भटकी जमात ब, क आणि ड साठी 1961 पूर्वीचा) ही सर्व कागदपत्रे साक्षांकित केलेली असावीत. अर्ज केल्यानंतर साधारणपणे 45 दिवसात जातीचे प्रमाणपत्र मिळते.

2- वय अधिवास प्रमाणपत्र याकरिता देखील टीसी, बोनाफाईड सर्टिफिकेट(4,10 आणि बारा), वडिलांचे टीसी तसेच अशिक्षित असतील तर तसा दाखला, रहिवासी दाखला (यापैकी कोणतेही एक), रेशन कार्ड,

घर टॅक्स पावती चालू व पंधरा वर्षांपूर्वीची, ग्रामपंचायत गाव नमुना-8, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो आणि स्थलांतरित व्यक्ती असल्यास बॉर्डस सर्टिफिकेट हे सर्व कागदपत्रे स्व साक्षांकित केलेली असावीत व हे प्रमाणपत्र साधारणपणे पंधरा दिवसात मिळते.

3- दहा टक्के आरक्षणाचे ईडब्लूएस प्रमाणपत्र याकरिता बोनाफाईड सर्टिफिकेट(4,10,12), टीसी, जन्म प्रमाणपत्र, महिलांसाठी किंवा ते अशिक्षित असतील तर तसा दाखला, वय अधिवास प्रमाणपत्र, तहसीलदाराने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र,

रहिवासी दाखला( कोणतेही एक), रेशन कार्ड, घर टॅक्स पावती चालू व पंधरा वर्षांपूर्वीची, ग्रामपंचायतीचा गाव नमुना -8, सातबारा, नमुना-8 अ, आधार कार्ड आणि पासपोर्ट फोटो व ही सर्व कागदपत्रे स्वसाक्षांकित केलेली असावीत. केल्यानंतर साधारणपणे हे प्रमाणपत्र सात दिवसात मिळते.

4- नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट हे कागदपत्र काढण्यासाठी देखील टीसी तसेच बोनाफाईड सर्टिफिकेट, वडीलांचा टीसी किंवा अशिक्षित असल्यास तसा दाखला, तीन वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, स्वतःचे जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो,

जातीची नोंद असल्याचा जात दर्शक पुरावा( यामध्ये अनुसूचित जाती व जमातींसाठी 1950 पूर्वीचा तर ओबीसीकरिता 1967 पूर्वीचा तर भटके जमात ब,क,ड यांच्यासाठी 1961 पूर्वीचा. हे कागदपत्रे देखील स्व साक्षांकित केलेली असावीत व हे प्रमाणपत्र अर्ज केल्यानंतर 21 दिवसात मिळते.

Ajay Patil