Chanakya Niti:- आपण आपले स्वतःचे जीवन एक सामाजिक परिस्थितीत जगत असतो तेव्हा आपल्याला जीवन जगत असताना अनेक गोष्टींचे पालन करावे लागते किंवा जे काही सामाजिक नियम असतात त्या नियमांच्या चाकोरीत एक प्रकारे आपले जीवन व्यतीत करावे लागते. सामाजिक नियम हे जरी व्यक्तीवर बंधनकारक नसले तरी एक चांगला समाज घडवण्यासाठी ते महत्त्वाचे असतात.
आपल्याला माहित आहे की समाजामध्ये अनेक प्रकारची व्यक्ती आपल्याला भेटतात किंवा आपल्या जवळचे देखील असतात. त्यातील प्रत्येकाचे स्वभाव गुण तसेच व्यक्तिमत्व हे वेगवेगळे असते अशा वेगवेगळ्या स्वभाव किंवा व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींबरोबर जेव्हा आपण राहतो तेव्हा त्यांचा कळत नकळत परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो.
त्यामुळे या संबंधीचे नेमके विवेचन आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतिमध्ये केलेले आहे. त्यांनी जीवनाबद्दलच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्या या नीतीमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये आचार्य चाणक्यांनी नेमक्या कोणत्या लोकांपासून आपण दूर राहणे गरजेचे आहे याबद्दल देखील विवेचन केलेले आहे. याबाबतची माहिती आपण या लेखात घेऊ.
चाणक्य सांगतात की या लोकांपासून राहावे चार हात लांब
1- चतुर आणि लालची लोक– आपल्याला जीवनामध्ये असे अनेक व्यक्ती आढळून येतात की ते प्रत्येक गोष्टीत खूप लालची असतात. म्हणजेच त्यांना एखादी गोष्ट मिळवण्याची खूप लालसा दिसून येते. तसेच अशा प्रकारच्या लोकांना एखाद्याची जर काही गोष्टीत प्रगती झाली तर ती सहन होत नाही किंवा त्यांना ती बघवत नाही.
लोक अशावेळी आपल्याला कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतात. त्यामुळे जर तुमच्यावर काही वाईट वेळ आली किंवा वाईट कालावधी सुरू असेल तर तुम्ही चुकून देखील अशा लोकांची मदत मागू नये. असे लोक कितीही समोरून चांगले वागत असले तरी ते तुमचे नुकसान करण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहिलेले चांगले.
2- स्वार्थी लोक– आपल्याला जीवनामध्ये असे अनेक लोक दिसून येतात की जेव्हा त्यांचे आपल्याकडे काम असते तेव्हा आपल्याला खूप महत्त्व देतात किंवा दिवसातून चारदा तरी कॉल करतात. परंतु काम संपले की आपल्याला ढुंकून देखील पाहत नाही किंवा विचारत देखील नाहीत. अशा लोकांनाच आपण स्वार्थी लोक असे म्हणतो.
अशा स्वार्थीपणाचे लक्षण असलेले लोक तुम्हाला केव्हा फसवतील हे सांगता देखील येत नाही. या स्वभावाचे लोक त्यांच्या फायद्यासाठी कुठल्याही पातळीपर्यंत जाऊ शकतात व काहीही करू शकतात.
लोकांना ज्या ठिकाणी फायदा दिसेल त्या ठिकाणी ते काम करतात. त्यामुळे अशा लोकांपासून चार हात लांब राहणे खूप गरजेचे आहे व अशा लोकांवर विश्वास तर बिलकुल ठेवू नये.
3- पाठीमागून बोलणारे आणि रागीट लोक– आपल्याला असे बरेच व्यक्ती दिसून येतात की आपल्या तोंडावर खूप गोड बोलतात किंवा आपल्याविषयी चांगले बोलतात. परंतु आपल्या पाठीमागे आपल्या विषयी ते कधीही चांगले बोलत नाही. त्याबद्दल आचार्य चाणक्य म्हणतात की, अशा रागीट स्वभावाच्या लोकांच्या जवळ कधीही जाऊ नये.
रागामध्ये व्यक्तीला नेमके चूक काय आहे आणि बरोबर काय आहे हे देखील व्यवस्थित कळत नाही किंवा तो विसरून जातो. यामध्ये असे व्यक्ती स्वतःचे प्रचंड नुकसान करतातच परंतु ते दुसऱ्याचे देखील नुकसान करण्याची शक्यता जास्त असते.
पुढच्या रागीट लोकांपासून दूर राहावे. दुसरे म्हणजे लोकांना पाठीमागून बोलण्याची सवय असते अशा लोकांच्या तर बिलकुल जवळ जाऊ नये. अशा स्वभावाचे व्यक्तीपासून चार हात लांब राहणे किंवा त्यांच्याशी बोलणे टाळणे योग्य ठरते.