स्पेशल

कार किंवा बाईकच्या आरसी बुकवरचा पत्ता बदलायचा आहे का? नका घेऊ टेन्शन! वापरा ‘ही’ सोपी पद्धत; लगेच होईल काम

Published by
Ajay Patil

जेव्हा आपण वाहन खरेदी करतो तेव्हा ते वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाचे रजिस्ट्रेशन व इतर महत्त्वाची कागदपत्रे खूप गरजेचे असतात. कारण भविष्यामध्ये काही अडचण निर्माण होऊ नये यासाठी या कागदपत्रांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. यातीलच एक महत्त्वाची कागदपत्र म्हणजे वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच आरसी बुक होय.

तुम्ही कार किंवा बाईक घेतली तर तुम्हाला नोंदणी प्रमाणपत्र गरजेचे असते व हे आरसी बुक तुम्हाला कायम अपडेट ठेवणे देखील महत्त्वाचे असते. यामध्ये समजा तुम्ही जर एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कायमस्वरूपी राहायला गेले आणि तुम्हाला जर कार किंवा बाईक किंवा इतर वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदलायचा असेल

तर मोटर वाहन कायदा 1988 नुसार नागरिकांना आरसी बुक वरील मालकाचा निवासी पत्ता बदलण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे याकरिता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नसून तुम्ही तुमच्या आरसी बुक वरील पत्ता ऑनलाईन पद्धतीने बदलू शकतात. यासंबंधीचेच माहिती आपण या लेखात बघू.

 आरसी बुकवरील ऑनलाईन पत्ता अशा पद्धतीने बदला

1- याकरिता तुम्हाला सगळ्यात अगोदर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय वाहन ई- सेवांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

2-

या ठिकाणी असलेल्या लॉगीन बटणावर क्लिक करा व त्यानंतर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुमचा युजर आयडी, सुरक्षा कोड  त्या ठिकाणी प्रविष्ट करावा आणि सबमिट बटन दाबा.

3- त्यानंतर ऑनलाईन सर्विस वर क्लिक करा व या ठिकाणी असलेल्या पर्यायांमधून वाहनाशी संबंधित असलेल्या सेवा निवडा.

4- त्यानंतर तुमच्या वाहन नोंदणी क्रमांक आणि वाहनाच्या चेसेस क्रमांकाचे शेवटचे पाच अंक त्या ठिकाणी नमूद करा व जनरेट ओटीपी बटनावर क्लिक करा.

5- त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर जो ओटीपी येईल तो एंटर करा आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर आरसी पर्याय मध्ये पत्ता बदला व हा पर्याय निवडा आणि नंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

6- डावीकडील मेनू पर्यायातील पत्ता बदलावर क्लिक करा. सर्व तपशील नमूद करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

7- सर्विस डिटेल्स टॅब अंतर्गत उपस्थित विमा पॉलिसी पर्यायावर आणि नंतर सबमिट बटणावर क्लिक करा. नंतर अपलोड डॉक्युमेंट्स पर्यायावर क्लिक करा.

8-त्यानंतर सेवा तपशील या अंतर्गत अपॉइंटमेंट पर्यायावर क्लिक करा व स्लॉट उपलब्ध मधून तारीख निवडा व त्यानंतर बुक नाऊ बटणावर क्लिक करा. शुल्क तपशील पर्यायावर क्लिक करा आणि आवश्यक तपशिलांचा पेमेंट करा. याकरिता पेमेंट गेटवे निवडा आणि सुरू ठेवा हे बटन दावा.

अधिक माहितीसाठी आरटीओ वेबसाईटला भेट द्यावी.

 आरसी बुक वरील पत्ता बदलण्यासाठी ही कागदपत्रे लागतात

यामध्ये आरसी वरचा पत्ता बदलण्यापूर्वी फॉर्म 33, नवीन पत्त्याचा पुरावा, नोंदणी प्रमाणपत्र तसेच पीयूसी प्रमाणपत्र, वैध विमा, वित्त पुरवठादार कंपनी व बँकेने जारी केलेले एनओसी( संबंधित वाहनावर कर्ज असेल तर), पॅन कार्डची प्रमाणित प्रत किंवा फॉर्म 60 आणि फॉर्म 61, स्मार्ट कार्ड फी पावती,चेसिस आणि इंजिन पेन्सिल प्रिंट आणि मालकाची सही

Ajay Patil