Car Buying Tips:- जेव्हा कोणत्याही व्यक्तीला कार खरेदी करायचे असते तेव्हा प्राधान्याने दोन गोष्टींना महत्त्व दिले जाते किंवा त्या गोष्टींचा विचार केला जातो व त्यातील पहिली गोष्ट म्हणजे आपल्या बजेटमध्ये मिळणारी कार आणि मायलेज व मिळणारे वैशिष्ट्ये इत्यादींचा. तसेच या सोबतच अनेक छोट्या मोठ्या गोष्टी देखील कार खरेदी करताना पाहिले जातात व यामध्ये बरेचजण कोणत्या रंगाची कार खरेदी करावी या गोष्टीला देखील बरेच महत्त्व देतात.
जर आपण बाजारपेठेत पाहिले तर विविध कंपन्यांच्या अनेक कार उपलब्ध असून रंगांमध्ये देखील विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे कार घेताना आपल्याला जो रंग आवडतो त्या रंगाची कार खरेदी करण्याकडे आपल्याला बऱ्याच जणांचा कल असल्याचे दिसून येतो.या रंगांच्या दृष्टिकोनातून बघितले तर बरेच लोक काळा रंगाची कार खरेदी करायला पसंती देतात.
परंतु अशाप्रकारे जर तुम्ही देखील काळ्या रंगाची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अगोदर तुम्ही काही गोष्टींची माहिती घेणे गरजेचे आहे. म्हणजे या रंगाची कार घेतल्यामुळे काही छोट्या-मोठ्या समस्या तुम्हाला उद्भवू शकतात.परंतु तुम्हाला त्या मोठ्या प्रमाणावर पश्चाताप देखील देऊन जाऊ शकतात.
काळ्या रंगाची कार खरेदी केल्याने होऊ शकतात या समस्या
1- उन्हाळ्यामध्ये त्रासदायक– जर आपण कार बाजाराचा विचार केला तर यामध्ये काळ्या रंगाच्या कार घेण्याला देखील मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. परंतु उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये जास्त उष्णतेच्या काळात या रंगाची कार तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. काळा रंगाची कार उन्हाळ्यामध्ये जास्त उष्णता शोषून घेते व अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कारच्या आतील भागामध्ये उष्णता पातळी वाढल्याने खूप मोठ्या प्रमाणावर समस्या येऊ शकते.
कारच्या केबिनमध्ये उष्णतेत वाढ झाल्याने कारच्या एसीला देखील खूप जास्त प्रमाणात काम करावे लागते. गाडी जर तुम्ही थोडा वेळ जरी उन्हात पार्किंग केली तरी देखील तुम्हाला प्रचंड प्रमाणात उष्णतेचा त्रास सहन करावा लागतो. ही प्रमुख समस्या काळ्या रंगाच्या कारच्या संदर्भात उद्भवते.
2- रस्त्यावर काळा रंग लवकर खराब होतो– जर आपण भारतातील आणि ग्रामीण भागातील रस्त्याचा एकंदरीत विचार केला तर आपल्याकडे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर धूळ दिसून येते. अशा रस्त्यांवरून प्रवास करत असताना काळा रंग लवकर खराब होण्याची शक्यता असते.
काळ्या रंगाच्या कारकडे धूळ आणि माती लवकर आकर्षित होऊन त्यावरती जास्त प्रमाणात चिकटते. त्यामुळे तुम्हाला काळ्या रंगाची कार नियमितपणे स्वच्छ करणे गरजेचे असते व जर तुम्ही असे केले नाही तर खूप लवकर खराब दिसायला लागते.
3- रंग फिक्कट होण्याची समस्या–काळ्या रंगाची कार घेण्यामागील सगळ्यात प्रमुख समस्या निर्माण होते ती म्हणजे हा रंग लवकर फिकट होऊ शकतो. तुम्ही जर काळ्या रंगाची कार निमितपणे सूर्यप्रकाशामध्ये पार्क केली तर त्या कारचा रंग फिकट व्हायला लागतो. या परिस्थितीमुळे गाडीचे चमक कमी होते व गाडी अजिबात दिसायला चांगली दिसत नाही.