सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पावसाने हजेरी लावलेली असून राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवलेला आहे. जर आपण यावर्षी पावसाची सुरुवात पाहिली तर ती काहीशी समाधानकारक अशी झालेली होती व जुलैच्या पहिल्या आठवड्यात मात्र राज्यात विश्रांती दिल्याचे चित्र होते.
परंतु त्यानंतर मात्र राज्यातील बहुतेक भागामध्ये चांगल्या पावसाने हजेरी लावली व बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. काही धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली तर अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याची सध्या स्थिती आहे. वाहतूक व्यवस्थेवर देखील या पावसाचा विपरीत परिणाम झाल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने परत पावसाचा हायअलर्ट दिला असून येणाऱ्या 18 जुलै पर्यंत राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
18 जुलै पर्यंत राज्यात ठिकठिकाणी पडेल मुसळधार पाऊस
सध्या राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावलेली आहे व या दरम्यान भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून देखील राज्यासाठी पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला असून येत्या 18 जुलै पर्यंत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे.
तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट असून महाराष्ट्रातील जळगाव आणि कोकणातील रत्नागिरी येथे मात्र पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून पुणे, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट तर मुंबई, ठाणे आणि पालघर या भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
या जिल्ह्यांशिवाय मराठवाडा आणि विदर्भातील बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे. मात्र मराठवाड्यातील परभणी, धाराशिव तसेच जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये मात्र तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मात्र विदर्भातील भंडारा, गोंदिया, अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना मात्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे व या ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
एवढेच नाही तर या कालावधीमध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर पर्यंत वेगाने वारे वाहतील असा देखील अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच सातारा आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात साधारणपणे गेल्या आठवड्यापासून सर्वीकडे मुसळधार पाऊस पडत असून मुंबई आणि पुणे शहरांमध्ये तर पावसाने दानादान उडवल्याची स्थिती आहे. त्यासोबतच मराठवाडा आणि विदर्भातील बऱ्याच भागांमध्ये पावसाने जोर पकडल्याचे चित्र असून कोकणात देखील मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.