स्पेशल

Success Story: वयाच्या 25 व्या वर्षी 1 ट्रक व 3 कर्मचारी घेऊन केली व्यवसायाला सुरुवात! आज कंपनीत आहेत 700 कर्मचारी आणि 200 ट्रक, टर्नओव्हर आहे 100 कोटींच्या आसपास

Published by
Ajay Patil

Success Story:- एखाद्या व्यवसायाची सुरुवात करणे आणि तो व्यवसाय मोठ्या स्वरूपात वाढवणे हा संपूर्ण प्रवास खूप खाचखडग्यानी आणि अडचणींनी भरलेला असतो व या सगळ्या गोष्टींवर मात करत आपल्याला यशाच्या शिखरापर्यंत मार्गक्रमण करावे लागते. कारण कुठलाही उद्योजक किंवा व्यावसायिक जर आपण बघितला तर त्याची सध्या आपल्याला जी स्थिती दिसते ती नक्कीच अगोदर नसते.

कारण इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर कष्ट आणि मेहनत करून पोहोचावे लागते. हाच मुद्दा आपल्याला प्रत्येक यशस्वी व्यावसायिकांच्या बाबतीत दिसून येतो. या पद्धतीने जर आपण ईशान सिंग बेदी या लॉजिस्टिक व्यवसायमध्ये असलेल्या उद्योजकाचा विचार केला तर आपल्याला हा मुद्दा  व्यवस्थित पटेल.

इशान सिंग बेदी यांनी वयाच्या 25 व्या वर्षी लॉजिस्टिकचा व्यवसाय सुरू केला. साधारणपणे 2007 मध्ये आठ लाख रुपये भांडवल टाकून तीन कर्मचारी आणि एक ट्रक घेऊन व्यवसायाला सुरुवात केली आणि आज त्यांची कंपनीत सातशे कर्मचारी कामाला असून 200 ट्रक त्यांच्या कंपनीच्या आहेत. हा जो त्यांचा प्रवास आहे हा नक्कीच सोपा नसून त्यामध्ये असंख्य अडचणीवर मात करत त्यांनी इथपर्यंत हे यश मिळवलेले आहे.

 ईशान सिंग बेदी यांची यशोगाथा

ईशान सिंह बेदी हे दिल्लीचे रहिवासी असून सन 2007 मध्ये त्यांनी लॉजिस्टिकच्या व्यवसायामध्ये पदार्पण केले व सुरुवातीला आठ लाख रुपयांचे भांडवल टाकून आणि सोबत तीन कर्मचारी आणि एक ट्रक घेऊन व्यवसायाला सुरुवात केली. आज त्यांचा हा व्यवसाय 700 कर्मचारी आणि 200 ट्रक पर्यंत पोहोचला आहेच परंतु त्यांचा वार्षिक टर्नओव्हर 100 कोटींच्या आसपास केलेला आहे.

ईशान सिंह बेदी यांनी सिंक्रोनाइज्ड सप्लाय सिस्टम नावाची कंपनी आहे व ती देशात थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर काम करते. ईशान सिंग बेदी यांनी या व्यवसायामध्ये आल्यानंतर हळूहळू ट्रकच्या संकेत वाढ केली व गोदामांची जागा देखील वाढवली. या व्यवसायमध्ये 78 लाख रुपयांची पहिल्याच वर्षी उलाढाल केली व त्यानंतर आत्मविश्वास वाढीस लागला व 2013 पर्यंत त्यांनी व्यवसाय 50 कोटी रुपयांवर नेऊन ठेवला.

ईशान सिंग बेदी यांनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, गुरुग्राम येथून बँकिंग आणि फायनान्समध्ये पदवी प्राप्त केली असून यांच्या वडिलांचा कस्टम क्लीअरन्स आणि फ्रेड फॉरवर्डिंगचा व्यवसाय होता व या व्यवसायात ईशान सिंग बेदी वडिलांना  मदत करत होते. 2007 मध्ये ईशान सिंग बेदी यांनी स्वतःची लॉजिस्टिक कंपनी सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली.

परंतु या इच्छेला मात्र घरचे सदस्य सहमत नव्हते. परंतु तरीदेखील त्यांनी ईशान यांना आठ लाख रुपयांचे भांडवल दिले व अशाप्रकारे सिंक्रोनाइज सप्लाय सिस्टम लिमिटेड कंपनीची मुहूर्तमेढ ईशांत सिंग बेदी यांनी रोवली. व्यवसायाला सुरुवात केल्यानंतर अगोदर ट्रक आणि गोदाम यांची संख्या कशी वाढेल यावर संपूर्ण फोकस केला.

कारण 2007 या कालावधीमध्ये ट्रक व्यवसाय मध्ये शिक्षित लोक खूप कमी होते व जे लोक अस्तित्वात होते ते ओळखीच्या जोरावर काम करायचे. परंतु ईशान सिंग बेदी यांनी शिक्षित असून देखील व्यवसायात पदार्पण केले व पहिल्याच वर्षी 78 लाख रुपयांची उलाढाल करण्यास ते यशस्वी झाले.

यामध्ये पहिली तीन वर्ष त्यांनी अतिशय कष्ट घेतले व एक ट्रक आणि तीन कर्मचाऱ्यापासून सुरू झालेल्या त्यांचा कंपनीचा प्रवासा 700 कर्मचारी आणि 200 ट्रक पर्यंत पोहोचला आहेच, परंतु आज त्यांच्या कंपनीची उलाढाल तब्बल शंभर कोटी रुपये आहे.

Ajay Patil