सध्या न्यायालयांमध्ये जर पाहिले तर सगळ्यात जास्त प्रकरणे हे घटस्फोटाशी संबंधित असून त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन जगत असताना अनेक छोट्या मोठ्या गोष्टींवर वादाची ठिणगी पडते व हा वाद इतका विकोपाला जातो की पती-पत्नी घटस्फोटाचा निर्णय घेतात.
घटस्फोट ही एक गंभीर अशी सामाजिक समस्या तर आहेच.परंतु कौटुंबिक दृष्टिकोनातून आणि पती-पत्नीच्या नात्यासाठी नक्कीच हिताचे नाही. घटस्फोट झाल्यानंतर त्याचे विपरीत परिणाम नुसते पती-पत्नीवर न पडता दोन्ही कुटुंबांवर तसेच मुलांवर देखील होत असतो. तसेच दोघांच्या भावनिक आणि मानसिक आयुष्यावर देखील याचा खूप मोठा विपरीत परिणाम होतो.
घटस्फोटामुळे अनेक आर्थिक पातळीवर देखील काही परिणाम संभवतात. यात प्रामुख्याने महिलांचे जे काही अधिकार आहेत त्यांचे प्रामुख्याने चर्चा केली जाते. परंतु घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये पुरुषांना काही अधिकार असतात का? हे देखील पाहणे तितकेच गरजेचे असते.
नेमके घटस्फोटानंतर पुरुषांना जे काही वडिलोपार्जित संपत्ती मिळालेली असते तिचे काय होते? याचा देखील कायदेशीर दृष्टिकोनातून विचार करणे गरजेचे असते. याचा अनुषंगाने या लेखात आपण घटस्फोटानंतर पुरुषांना काय अधिकार असतात व संपत्तीची वाटणी कशी केली जाते? या व इतर काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे शोधू.
घटस्फोट प्रक्रियेत
कोणाचे काय असतात अधिकार?1- घटस्फोटाच्या प्रक्रियेमध्ये ज्याप्रमाणे महिलेचे म्हणजेच पत्नीचे अधिकार असतात अगदी त्याचप्रमाणे पतीचे देखील काही अधिकार असतात. या अधिकाराच्या दृष्टिकोनातून बघितले तर पत्नीच्या आई-वडिलांनी लग्नात ज्या काही भेटवस्तू दिलेल्या असतात त्यावर पतीचा अधिकार असतो. तसेच लग्न होण्याच्या अगोदर किंवा लग्नात किंवा लग्नाच्या नंतर पत्नीच्या आई-वडिलांनी दिलेल्या भेटवस्तूंवर देखील पतीचा अधिकार असतो.
2- एखादी संपत्ती पतीने पत्नीच्या नावावर खरेदी केलेली आहे. परंतु ती पत्नीला भेट म्हणून दिलेली नाही. तर अशा संपत्तीवर देखील पत्नीला कुठलाही अधिकार नसतो.
3- समजा पत्नीने जर स्वतः संपत्ती खरेदी केलेली असेल तर त्या संपत्तीवर पत्नी दावा करू शकते.
4- पती-पत्नी मिळून दोघांनी एखादी वस्तू किंवा संपत्ती खरेदी केलेली असेल व त्याकरिता पतीने आर्थिक मदत केली असेल तर अशा संपत्तीच्या बाबतीत पतीचा दावा अधिक मजबूत ठरू शकतो.
5- तसेच एखादे संपत्ती खरेदी करण्यासाठी पती व पत्नी दोघांनी मिळून कर्ज घेतलेले आहे तर अशा संपत्तीचे वाटणी दोघांमध्ये केली जाते. यामध्ये सदर प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी कोणी किती योगदान दिलेले आहे हे पाहून संपत्तीचे विभाजन होत असते.
6- पतीने एखादी वस्तू खरेदी केली व त्या वस्तू खरेदीसाठी लागणारा पैसा स्वतः दिलेला आहे तर ती वस्तू किंवा संपत्ती ही पतीची असते.
7- परंतु दुसऱ्या प्रकरणांमध्ये जर एखादी संपत्ती जरी पतीने खरेदी केलेली आहे परंतु ती पत्नीच्या नावावर आहे तर अशा संपत्तीवर पत्नी दावा करू शकते व ती संपत्ती पत्नीला मिळण्याची शक्यता असते. अशा प्रकरणांमध्ये संबंधित संपत्ती खरेदी करण्यासाठी किंवा घेण्यासाठी मीच पैसे दिलेले आहेत हे जर पतीला सिद्ध करता आले नाही तर अशा प्रकारचे संपत्ती पत्नीला मिळते.
8- तसेच काही संपत्ती ही पतीला पूर्वजांकडून मिळालेली असते व त्यावर पत्नी कुठल्याही प्रकारचा दावा करू शकत नाही.