स्पेशल

Real Estate: फ्लॅट खरेदी करा परंतु त्यापूर्वी समजून घ्या कार्पेट आणि बिल्ट अप एरिया म्हणजे काय? नाहीतर पैसे जाऊन नाही होणार फायदा

Published by
Ajay Patil

Real Estate:- जेव्हा आपण प्लॉट किंवा फ्लॅट तसेच एखादे घर खरेदी करतो तेव्हा अशा अनेक गोष्टी असतात की त्याकडे आपण लक्ष न देता व्यवहार पूर्ण करतो व नंतर पैसे जाऊन देखील आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. बरेच जण हे जेव्हा शहरांमध्ये राहायला जातात तेव्हा शहरांमध्ये स्वतःचा फ्लॅट असावा असे स्वप्न प्रत्येकाचे असते व त्याकरिता होम लोन वगैरे घेऊन फ्लॅट खरेदी केला जातो.

परंतु अशा पद्धतीने जेव्हा फ्लॅट खरेदी करतो तेव्हा त्याच्या क्षेत्रफळाबद्दल आपण सर्वप्रथम विचारतो आणि बिल्डर जो बिल्ट अप एरिया सांगतो तोच आपण फ्लॅटचे क्षेत्रफळ म्हणून समजतो आणि त्यावरूनच त्या फ्लॅटची किंमत आपण ठरवत असतो. त्यामुळे आपण फ्लॅट घेण्या अगोदर बिल्ट अप एरिया आणि कार्पेट एरिया म्हणजे नेमकं काय? हे समजून घेणे खूप गरजेचे आहे.

 बिल्टप एरिया आणि कार्पेट एरिया म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे एखाद्या फ्लॅटचे सर्वसाधारण बाहेरील सर्व बाजूंचे मोजमाप केले असता जे क्षेत्रफळ येथे त्याला पण बिल्ट अप एरिया असे संबोधतो. तसेच प्रत्येक खोलीच्या चार भिंतीच्या आतमधील जे काही क्षेत्रफळ येते त्याला कार्पेट एरिया असे म्हटले जाते यालाच आपण चटई क्षेत्र असे देखील म्हणतो.

चटई  क्षेत्र म्हणजे ज्या ज्या ठिकाणी चटई अंथरता येईल त्या त्या क्षेत्रफळाला चटई क्षेत्र म्हटले जाते. संबंधित फ्लॅटच्या नकाशावर प्रत्येक खोलीच्या दिलेल्या मोजमापाप्रमाणे क्षेत्रफळ काढून फ्लॅटच्या आतल्या सर्व भागाचे म्हणजेच पॅसेजचे मोजमाप देखील काढून आपल्याला एकूण चटई क्षेत्र काढता येते.

 व्यवस्थित पद्धतीने चटई क्षेत्र आणि बिल्ट अप क्षेत्र समजून घेणे गरजेचे

जेव्हा आपण फ्लॅट विकत घेतो तेव्हा त्या फ्लॅटचा जीना आणि पॅसेज सोडून बांधकाम क्षेत्र म्हणजेच बिल्टप एरिया काढता येऊ शकतो. साधारणपणे कोणताही ग्राहक फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी एखाद्या जाणकाराला किंवा आर्किटेकला याबाबत विचारत नाहीत. त्यामुळे पैसे जाऊन देखील क्षेत्रफळ कमी वाटायला लागते व सगळ्यांकडे तेव्हा आपण चौकशीला सुरुवात करतो.

तोपर्यंत बिल्डरचा जो काही करारनामा असतो त्यावर आपण सही करून सर्व काही अटी कबूल केलेले असतात व नंतर बिल्डर आपल्याला काहीही बोलू देत नाही व नंतर आपण फसवले जातो व यामुळे पश्चाताप वाटायला लागतो. त्याकरिता फ्लॅट खरेदी करण्या अगोदर सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा असतो की प्रत्यक्षात फ्लॅट किती चौरस फूट आहे याची जाणकाराकडून माहिती करून घेणे हे गरजेचे असते.

बिल्डरचा जो काही करारनामा असतो त्या ठिकाणाचे क्षेत्र आणि प्रत्यक्षात असलेले क्षेत्र याचा काही ताळमेळ बसत आहे का व बसत असेल तर समोर स्पष्ट विचारून दाराप्रमाणे क्षेत्र नक्की करावी याचा दर कमी करावा. अशा पद्धतीने फ्लॅटचे जे अचूक क्षेत्रफळ असेल त्या क्षेत्रफळावरच दर काढून किंमत नक्की करावी.

 पार्किंगच्या जागेचा प्रश्न असतो महत्त्वाचा

तसे पाहायला गेले तर प्रत्येक बिल्डरला पार्किंगची सोय करून देणे हे महापालिकेच्या नियमानुसार एक महत्त्वाची अटच असते. एवढेच नाही तर नकाशामध्ये किती फ्लॅट बांधणार व त्यामध्ये किती पार्किंग असणार याचा तपशील दिल्यावरच नकाशे मंजूर होतात. विशेष म्हणजे पार्किंग क्षेत्राचे मंजुरी बिल्डरांना त्यांचे जे काही बांधकाम क्षेत्रफळ आहे त्याच्याशिवाय दिलेली असते.

त्यामुळे फ्लॅट घेताना प्रत्येकाचे पार्किंग किंवा हक्काचे पार्किंग पाहणे गरजेचे असते. तुम्ही बिल्डरकडे यासंबंधी हट्ट करू शकतात किंवा करारनामामध्ये स्पष्ट उल्लेखही पाहून घेणे गरजेचे असते. यामध्ये प्रश्न पडतो की पार्किंग करता वेगळी किंमत मोजायची असते का किंवा ती किती व नेमकी वाजवी कोणते? या प्रश्नाचे उत्तर असे आहे की बिल्डर ज्यावेळेस एकूण प्रकल्पाचा खर्च काढता त्या वेळेला सर्व सुविधा आणि करण्यात आलेले बांधकाम या सर्वांचा खर्च आणि भागिले विक्री करण्यात येणारे क्षेत्र या सर्वांचा ताळमेळ बसवतात व नंतर दर काढतात.

त्यामुळे बांधकामाचा दर अधिक जागेचा दर याच्या कितीतरी पट अधिक येतो. समजा तुम्ही जर पार्किंगसाठी पैसे मोजणार असाल तर तुम्हाला ड्रेनेज लाईन तसेच वॉटर टॅंक व इतर अंतर्गत रस्त्यांची देखील किंमत द्यावी लागेल.

त्यामुळे तुम्ही जर सर्वात जास्त दर कबूल करत असाल तर तो पार्किंगसह असावा अशा प्रकारचा आग्रह तुम्ही बिल्डरकडे धरू शकतात किंवा फ्लॅटचा अगदी वाजवी दरामध्ये सरकारी किमती प्रमाणे जागेची किंमत जे काही चालू बांधकाम आहे त्याचा दर्जा यानुसार तुम्ही बांधकामाचा दर योग्य असल्यास पार्किंगला एकूण क्षेत्रफळाच्या निम्मे क्षेत्र गृहीत धरून त्यावर बिल्ट अप रेट देण्यास काही हरकत नसते.

Ajay Patil