स्पेशल

अस्तित्वात नसताना ३५ शॉप, २५ फ्लॅटची नोंद ! मा. नगराध्यक्ष विजय औटीपुढील अडचणी वाढल्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पारनेर नगरपंचायत हद्दीतील गट क्र. ३९०३,३५५४/१, ३५४०/१ व ३५४४/२ मिळकत नंबर २५९४/२५९६ या जमीनीवर भैरवी अपार्टमेंट अस्तित्वात नसतानाही नगरपंचायत मागणी रजिस्टर तथा नमुना नं ८ वर ३५ शॉप व २५ फ्लॅटची बेकायदेशीर नोंद लावून बनावट सात बारा उताऱ्याच्या आधारे बनावट कागदपत्रे तयार करून नगरपंचायत पारनेर प्रशासनाचा खोटा पुरावा सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी मा. नगराध्यक्ष विजय औटीसह इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पारनेर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनय शिपाई यांनी पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्ष समिर बारवकर यांना पत्र दिले आहे.

गुन्हा दाखल करण्याकामी छबन रघुनाथ औटी, राजेंद्र भाऊसाहेब पठारे व माधव मारूती गाजरे यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी नगरपंचायतीच्या प्राधिकृत कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी सांगितले.पारनेर नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने दि. २८नोव्हेंबर २०२३ रोजी संबंधित मिळकतीची स्थळ पाहणी केली असता त्या मिळकतीवर भैरवी अपार्टमेेंट इमारत अस्तित्वात नाही. मात्र नगरपंचायत मागणी रजिष्टर तथा नमुना नं ८ वर भैरवी अपार्टमेंट असा उल्लेख करून त्यावर एकूण ३५ शॉप व २५ फ्लॅटची बेकायदेशीर नोंद आढळून आल्याचे संबंधीत तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे. सदर नोंद दुय्यम निबंधक पारनेर यांचयाकडे दस्त ५७१७/२०१५ दि.२८/१०/२१०५ सुची क्र. २ अर्जावरून नगरपंचायत दप्तरी नोंद केल्याचे सिध्द होत असल्याचे नगरपंचात मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रात म्हटले आहे.

प्रत्यक्षात भैरवी अपार्टमेंट व त्यावर ३५ शॉप व २५ फ्लॅट नसतानाही नगरपंचायत प्रशासनाकडे खोटा अर्ज सादर करून नगरपंचायत प्रशासनाला खोटी माहीती सादर करून बनावट माहीतीच्या व कागदपत्रांच्या अधारे नोंदणी नं ८ रजिस्टरला खोटी नोंद लावून काहीतरी हेतू साध्य करण्याच्या इराद्याने जमीन मालक विजय सदाशिव औटी, संभाजी बबन मगर, विजया भागाजी नवले सर्व रा. पारनेर यांनी नोंदणी नं ८ रजिष्टरला खोटी नोंद लावून बनावट दस्त तयार करून घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
दरम्यान, खा. नीलेश लंके यांचे सहकारी अ‍ॅड. राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी विजय औटी व त्याच्या सहकाऱ्यांवर खुनाचा प्रयत्न तसेच इतर कलमांन्वये गुन्हे दाखल असून औटीसह इतर तिघे सध्या पारनेर पोलीस ठाण्याच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अशातच पारनेर नगरपंचायतीनेही औटी याच्यासह इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने औटीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पारनेर न्यायालयातील वकील व खा. नीलेश लंके यांचे सहकारी अ‍ॅड. राहुल बबनराव झावरे या जीवघेणा हल्ला करणा-या विजय औटी, त्याचा भाव नंदकुमार औटी व प्रितेश पानमंद यांच्यावर संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत कायमस्वरूपी तडीपार करण्याची मागणी ज्येष्ठ विधीज्ञ असिम सरोदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.

सरोदे यांनी नमुद केले आहे की, फसवणूक करणे, सरकारी कामात अडथळा आणून अधिकाऱ्यांना मारहाण करणे, मयताच्या जमीनीची खरेदी विक्री करणे, जीवे मारण्याची धमकी देऊन खुनाचा प्रयत्न करणे, पदाचा दुरूपयोग करून नगरपंचायतमध्ये खोटया नोंदी करणे, बनावट कागदपत्रे तयार करून बँका, पतसंस्थांकडून कर्ज घेऊन औटी व त्याच्या सहकाऱ्यांनी आर्थिक गुन्हे केलेेले आहेत. विजय औटी व त्याच्या सहका-यांवर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल आहेत. विजय औटी याने त्याच्या पदाचा गैरवापर करून नगरपंचायतमध्ये केलेल्या खोटया नोंदीप्रकरणी पारनेर नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी पारनेर पोलीसांकडे विजय औटी व त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पत्र दिले असल्याचे सरोदे यांनी म्हटले आहे.
विजय औटी व त्याचे सहकारी संघटीत गुन्हेगारी करून समाजात दहशतीचे वातावरण करीत असल्याने त्यांना कायमस्वरूपी तडीपार करणे गरजेचे असल्याची आग्रही मागणी सरोदे यांनी केली आहे.

विजय सदाशिव औटी त्याचा भाऊ नंदू औटी, प्रितेश पानमंद, अंकुश ठुबे, नीलेश उर्फ धनू घुमटकर, संगम सोनवणे, नामदेव औटी, मंगेश कावरे, पवन औटी, प्रमोद रोहोकले, प्रथमेश रोहोकले, सुरेश औटी व इतर अनोळखी ३ ते ४ इसमांनी अ‍ॅड. राहुल झावरे यांच्यावर दि.६ जुन रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पारनेर शहरातील आंबेडकर चौकात प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेेले अ‍ॅड. झावरे हे आजूनही अतिदक्षता विभागात उपचार घेत असून त्यांच्यावरील काही शस्त्रक्रियाही अद्याप प्रलंबित आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24