स्पेशल

राज्यातील ‘या’ 30 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचे केले जाणार नियमित समावेशन! समावेशनाची प्रक्रिया सुरू

Published by
Ajay Patil

Health Department Decision:- राज्यामध्ये विविध जिल्हा परिषद अंतर्गत अनेक विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या आहे व गेल्या कित्येक दिवसापासून कंत्राटी तत्वावर बरेच कर्मचारी सेवा बजावत आहेत. अगदी हीच परिस्थिती आपल्याला आरोग्य विभागाच्या दृष्टिकोनातून देखील दिसून येते

जर आपण राज्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून राज्यात जवळपास 30 हजार हजार कर्मचारी कंत्राटी पद्धतीने सेवा बजावत आहेत व आता या 30 हजार कर्मचाऱ्यांचे नियमित समायोजन केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नक्कीच आता या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी असलेल्या 30 हजार कर्मचाऱ्यांचे होणार नियमित समायोजन
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी असलेल्या 30000 कर्मचाऱ्यांचे नियमित समायोजन केले जाणार असून या पार्श्वभूमीवर आता आरोग्य विभागाच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना पत्र पाठवण्यात आलेले आहे व यामध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागातील रिक्त पदांची माहिती मागविण्यात आलेली आहे.

संपूर्ण राज्याचा विचार केला तर आरोग्य विभागामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सुमारे एकूण 30 हजार कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर काम करत असून यामध्ये अधिपरिचारिका, बहुउद्देशीय कर्मचारी तसेच स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, औषध निर्माण अधिकारी व लेखा अधिकारी तसेच कार्यक्रमाधिकारी व इतर पदांचा यामध्ये समावेश आहे.

या सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामानुसार म्हणजेच कामगिरी नुसार पाच टक्के मानधन वाढ दिली जाते. परंतु गेल्या पंधरा ते सोळा वर्षापासून कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी केली जात असून त्यासाठी संघटनेच्या वतीने आंदोलन देखील करण्यात आले होते व शासनाकडे यासंबंधीचे निवेदन सादर करण्यात आले होते.

13 मार्च 2024 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता निर्णय
शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते व त्याबाबत 13 मार्च 2024 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये समावेशनाचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

परंतु अजून पर्यंत यासंबंधीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नव्हती व कर्मचाऱ्यांना समावेशनाची प्रतीक्षा लागून होती. परंतु आता राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समावेशनाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

Ajay Patil