सध्या बेरोजगारीची समस्या ही गंभीर स्वरूपात संपूर्ण देशात असल्याने सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येत आहे व त्यामुळेच बेरोजगारीच्या या समस्येवर मात करता यावी म्हणून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेकविध प्रयत्न केले जात आहेत. नोकऱ्यांची उपलब्धता कमी झाल्यामुळे आता अनेक तरुण-तरुणी व्यवसायांकडे वळत आहेत.
परंतु व्यवसाय करायचा म्हटला म्हणजे त्याकरिता देखील पैसा लागतो व पैशांच्या अडचणीमुळे व्यवसाय करण्याची इच्छा असताना देखील बऱ्याच जणांना व्यवसाय उभारण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. या समस्यावर उपाय म्हणून तरुणांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे व त्यांना आर्थिक आधार मिळावा याकरिता सरकारच्या माध्यमातून अनेक पावले उचलण्यात येत असून त्या पावलांचा एक भाग म्हणून काही योजनांची आखणी सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. अशा योजनांच्या माध्यमातून कर्जाचे सुविधा उपलब्ध झाल्याने अनेक बेरोजगार युवक युवतींना कर्ज मिळू शकते व ते आपला व्यवसाय उभारू शकतात. इतकेच नाही तर जे व्यवसाय अस्तित्वात आहे त्यामध्ये ते वाढ करू शकतात.
सरकारच्या या योजना व्यवसायासाठी देतात ताबडतोब कर्ज
1) स्टॅन्ड-अप इंडिया योजना –
ही एक महत्त्वाची योजना असून समाजातील तळागाळातील महिला आणि एससी/ एसटी प्रवर्गातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे व याअंतर्गत दहा लाख ते 1 कोटी पर्यंतचे कर्ज दिले जाते. या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जाचा कालावधी हा सात वर्षांचा असतो व या कालावधीमध्ये या कर्जाची परतफेड करावी लागते. स्टॅन्ड अप इंडिया योजनेच्या माध्यमातून जर कर्ज घेतले तर व्यवसायिकांना खूप मोठा फायदा होतो. यामध्ये जर एखाद्या व्यक्तीने स्टँड अप इंडिया योजनेच्या माध्यमातून व्यवसाय सुरू केला तर पहिल्या तीन वर्षासाठी त्याला टॅक्स मध्ये सूट मिळते. त्यानंतर त्यावर बेस रेटसह तीन टक्के व्याजदर आकारला जातो. स्टँड अप इंडिया योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या योजनेच्या https://www.standupmitra.in/ या अधिकृत पोर्टल वर जाऊन यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरून अर्ज करावा लागतो व काही दिवसानंतर कर्ज मंजूर होते.
2) पीएमएमवाय( प्रधानमंत्री मुद्रा योजना) –
ही योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आलेली होती. प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून बिगर कृषी लघु/ सूक्ष्म उद्योगांना दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. या योजनेच्या माध्यमातून मिळणारे कर्ज हे व्यावसायिक बँका तसेच लघु वित्त बँक, एमएफआय आणि एनबीएफसी द्वारे दिली जातात. भारतामधील कोणत्याही व्यावसायिक या योजनेकरिता www.udyammitra.in या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकतो.
तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा तसेच सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट, उत्पन्नाचा पुरावा आयटीआआर, या योजनेसाठीचा अर्ज, निवास/कार्यालयाचा मालकीचा पुरावा आणि तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे त्याची माहिती सादर करणे गरजेचे असते. या योजनेच्या माध्यमातून तीन प्रकारांमध्ये कर्ज देण्यात येते. यातील पहिला प्रकार म्हणजे शिशु विभाग असून या माध्यमातून 50000 पर्यंत कर्ज मिळते तर किशोर या विभागांमध्ये 50 हजारापासून ते पाच लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाते आणि तरुण हा तिसरा भाग असून त्यातील पात्र उमेदवारांना पाच लाखापासून ते दहा लाख रुपयापर्यंत कर्ज मिळते.
3) राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळ योजना –
सूक्ष्म तसेच लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना खास लॉन्च करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून दोन प्रकारे कर्ज दिले जाते व यातील पहिला प्रकार म्हणजे मार्केटिंग सहाय्य योजना ही असून या पैशांमधून तुम्ही तुमच्या उत्पादनांची जाहिरात किंवा मार्केटिंग करू शकतात व तुमचे उत्पादन ग्राहकांपर्यंत आरामात पोहचवू शकतात. तसेच या माध्यमातून मिळणारे दुसरे कर्ज म्हणजे क्रेडिट सहाय्यक कर्ज हे होय. या प्रकारामधून जो पैसा मिळतो त्यामधून तुम्ही कच्चामालाची खरेदी करू शकतात व तुमच्या उत्पादनात वाढ करू शकतात. या प्रकारचे कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही बँकेशी संपर्क साधने गरजेचे असते.
4) क्रेडिट गॅरंटी फंड योजना –
सध्या स्टार्टअप्स मोठ्या प्रमाणावर सुरू केले जात असून अशा स्टार्टअप्सला प्रोत्साहन व चालना देण्याकरिता सरकारच्या माध्यमातून क्रेडिट गॅरंटी फंड ही योजना सुरू करण्यात आलेली असून या अंतर्गत स्टार्टअप कंपन्यांना जास्तीत जास्त पाच कोटी रुपयांचे कर्ज मिळते. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर https://www.cgtmse.in या पोर्टलला भेट देणे गरजेचे आहे व याकरिता तुम्हाला तुमच्या नवीनतम स्टार्टअपचा वार्षिक अहवाल सादर करावा लागतो. तसेच इतर आवश्यक गोष्टी पूर्ण करून या माध्यमातून तुम्हाला कर्ज मिळते. या योजनेच्या अधिक माहिती करिता तुम्ही registration@cgtmse.in वर संपर्क साधू शकतात.
5) एमएसएमई कर्ज योजना –
व्यवसायासाठी लागणारे वर्किंग कॅपिटलची गरज पूर्ण करण्याकरिता सरकारच्या माध्यमातून MSME कर्ज योजना सुरू करण्यात आलेली असून या अंतर्गत कोणत्याही नवीन किंवा सुरू असलेल्या उद्योगाला एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळते व या कर्ज मंजुरीकरिता आठ ते बारा दिवसाचा कालावधी लागतो. त्यामध्ये एक महत्त्वाची बाब अशी आहे की तुम्ही केलेला कर्जासाठीचा अर्ज मंजूर झाला की रिजेक्ट हे फक्त तुम्हाला 59 मिनिटांमध्ये कळते.यासाठीची कर्ज तुम्हाला कुठल्याही बँकेत मिळू शकते व याकरिता पॅन कार्ड, आधार कार्ड तसेच मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी कागदपत्रांची गरज भासते व MSME कर्जाकरिता अर्ज करणाऱ्या सर्व सह अर्जदारांना त्यांचा निवासी पत्त्याचा पुरावा सादर करावा लागतो.