स्पेशल

Retirement Planning: आयुष्याच्या 20 वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी जमा करा आणि रिटायरमेंटनंतर आर्थिक समृद्ध रहा! कसे ते वाचा?

Published by
Ajay Patil

Retirement Planning:- आयुष्यमध्ये एखादी नोकरी किंवा व्यवसाय करायला व्यक्ती सुरुवात करतो. तेव्हा ते आयुष्याच्या उतारवयापर्यंत करणे शक्य होत नाही. साधारणपणे आयुष्याची असे काही वर्षे असतात की त्या कालावधीत आपल्याला काम करता येते व पैसा कमावता येतो व याच कालावधीमध्ये आपल्याला निवृत्तीनंतर आयुष्य आर्थिक दृष्टिकोनातून अनिश्चितता राहू नये किंवा पैशांच्या बाबतीत आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून राहायची वेळ येऊ नये याकरिता आर्थिक नियोजन करणे खूप गरजेचे असते.

दुसरे म्हणजे सध्याची लाईफस्टाइल पाहिली तर नोकऱ्यांची  अनिश्चितता आणि आर्थिक स्तर उंचावण्याकरिता बरेचजण नोकऱ्या बदलत राहतात. निवृत्तीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर बरेच जण आता वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत नोकरी करायची आणि त्यानंतर निवृत्ती घेऊन म्हणजेच रिटायरमेंट घेऊन व्यवस्थित जगायचे अशा पद्धतीचा विचार करतात.

हे करता येऊ शकते परंतु त्यासाठी योग्य नियोजन तुम्ही केले तरच तुम्ही 40 व्या वर्षी रिटायरमेंट घेऊ शकतात. अशा पद्धतीची जर तुम्हाला प्लॅनिंग करायची असेल व कोट्यावधींचा कॉर्पस फंड जमा करायचा असेल तर प्लॅनिंग करणे गरजेचे असते. याकरिता निवृत्तीचे अचूक नियोजन करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर रिटायरमेंट घेण्याकरिता कोट्यावधी रुपयांचा कॉर्पस फंड कसा उभारणे शक्य आहे? हे आपण पाहू.

 कमी वयात

रिटायरमेंट घेण्यासाठी कोट्यावधींचा फंड कसा उभाराल?

1- कमी वयामध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीला प्राधान्य देणे जेव्हा आपण नोकरी करायला सुरुवात करतो तेव्हा गुंतवणुकीसाठी विचार कराल तेव्हा तो कमीत कमी कालावधीसाठी न करता दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर देणे गरजेचे आहे.

उदाहरणच घ्यायचे झाले तर तुमच्या पहिल्या नोकरीपासून जर तुम्ही प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपयांची म्युच्युअल फंडमध्ये न खंड पडू देता एसआयपी करायला सुरुवात केली व सातत्याने वीस वर्ष ते सुरू ठेवले तर तुम्ही चार लाख 80 हजार रुपयांची गुंतवणूक करतात.

एसआयपीच्या माध्यमातून मिळणारा परतावा पाहिला तर तो साधारणपणे 12% असतो व त्या हिशोबाने तुम्हाला 15 लाख रुपये मिळतात. म्हणजे वीस वर्षाच्या कालावधीत गुंतवणूक चार लाख 80 हजार आणि  मिळणारा परतावा पंधरा लाख असे मिळून वीस लाख रुपये एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही जमा करू शकता.

2- एसआयपीतील गुंतवणूक रकमेत वाढ करणे जेव्हा आपण सुरुवातीच्या कालावधीमध्ये दोन हजाराच्या एसआयपी ने वीस लाख रुपये जमा करू शकतो. परंतु कालांतराने तुमच्या पगारामध्ये वाढ होऊ शकते व त्या पद्धतीने जर तुम्ही एसआयपीत करत असलेल्या गुंतवणूक रक्कम जर वाढ करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.

साधारणपणे नोकरीच्या वीस वर्षाच्या कालावधीत तुमची चार ते पाच वेळेस पगार वाढु शकते व त्या पद्धतीने तुम्ही जर एसआयपीची रक्कम दुप्पट केली तर त्याचे मूल्य तीन ते चार पटीने वाढते. टप्प्याटप्प्याने जर तुम्ही एसआयपीची रक्कम वाढवत गेला तर गुंतवणुकीचा ताण येत नाही.

नाहीतर मग प्रत्येक महिन्याला वीस हजारांची एसआयपी सलग वीस वर्षे केली आणि त्यावर 12% चा परतावा अपेक्षित पकडला तर वीस वर्षांनी गुंतवणुकीचे मूल्य दोन कोटी रुपये होऊ शकते. त्यामुळे अगदी सुरुवातीपासून टप्प्याटप्प्याने एसआयपीतील गुंतवणूक वाढवत गेला तर तुम्ही वीस वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी नक्कीच उभारू शकता.

Ajay Patil