Samsaptak Rajyog: येणारी दिवाळी ही काही राशींच्या दृष्टिकोनातून खूप शुभ आणि फलदायी अशी ठरणार आहे. कारण ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर ग्रहांचे जे काही राशी परिवर्तन होते किंवा एका राशीतून दुसऱ्या राशीत भ्रमण होते तर या गोष्टींचा खूप मोठा परिणाम हा व्यक्तीच्या आयुष्यावर होत असतो.
ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर शुक्र हा धन तसेच सन्मान व समृद्धीचा कारक मानला जातो. त्यामुळे साहजिकच शुक्राच्या राशी परिवर्तनाचा परिणाम हा बारा राशींपैकी प्रत्येक राशींवर करिअर व व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आणि आर्थिक दृष्टिकोनातून देखील होत असतो.
ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर सध्या शुक्र हा वृषभ राशीमध्ये विराजमान असून गुरुसह विशेष योग घडवून आणत आहे. गुरु आणि शुक्र हे दोन्ही ग्रह समोरासमोर आले असून त्यामुळे समसप्तक राजयोग तयार होत आहे व सात नोव्हेंबर पर्यंत हा राजयोग असणार आहे.
परंतु या कालावधीत समसप्तक राजयोगामुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात खूप सकारात्मक आणि आनंददायी असे बदल घडून येणार आहेत. त्यामुळे या लेखात आपण दिवाळीच्या आधी कोणत्या राशींना समसप्तक राजयोग फायद्याचा ठरणार आहे? याबद्दलची माहिती घेऊ.
समसप्तक राजयोगामुळे या राशींचे नशीब फडफडणार
1- मेष– समसप्तक राजयोग हा मेष राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार असून या कालावधीत या राशींच्या व्यक्तींना अमाप संपत्ती मिळू शकते. ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर मेष या राशीमध्ये गुरु दुसऱ्या घरात आणि शुक्र आठव्या घरात स्थित असून त्यामुळे या राशीच्या लोकांना अनपेक्षितपणे आर्थिक फायदा होऊ शकतो.
बऱ्याच दिवसापासून रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. या कालावधीत जर कुठेही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ती गुंतवणूक फायदा देणारी ठरणार आहे.
2-वृषभ– ज्योतिषशास्त्रानुसार बघितले तर या राशीच्या चढत्या घरामध्ये गुरु सध्या असून सातव्या घरामध्ये शुक्र आहे. त्यामुळे ही परिस्थिती या राशींच्या व्यक्तींसाठी खूप फायद्याची ठरणार आहे.
शुक्राच्या उपस्थितीमुळे या राशींच्या लोकांना भरपूर प्रमाणात आर्थिक फायदा मिळणार असून गुरुच्या बलामुळे या राशींच्या लोकांचे भाग्य त्यांच्या बाजूने असणार आहे.
या सगळ्या परिस्थितीमुळे समाजात मानसन्मान वाढण्यास मदत होणार असून करिअरमध्ये देखील प्रतिष्ठा व पद मिळू शकते. या कालावधीमध्ये अध्यात्माकडे विशेष कल दिसून येईल व धार्मिक स्थळांना भेट देण्याची देखील शक्यता आहे. तसेच या कालावधीत आरोग्य देखील उत्तम राहील.
3- कर्क– कर्क राशींच्या व्यक्तींसाठी 7 नोव्हेंबर पर्यंतचे दिवस हे फायदेशीर असणार असून या कालावधीत कर्क राशींच्या व्यक्तींवर गुरु आणि शुक्राचा मोठा आशीर्वाद असण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सुख समृद्धी तर मिळेलच परंतु सुख सुविधांमध्ये देखील वाढ होईल. जीवनामध्ये जर काही समस्या सुरू असतील तर त्या देखील संपण्याची शक्यता आहे. जे व्यक्ती नोकरी शोधत असतील त्यांना नोकरी मिळू शकते.
तसेच या कालावधीत घर किंवा वाहन घेण्याचे स्वप्न असेल तर ते देखील पूर्ण होईल. सध्या ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर कर्क राशीच्या पाचव्या भावामध्ये शुक्र आणि अकराव्या घरामध्ये गुरु आहे व याचा फायदा करिअरच्या क्षेत्रात खूप मोठा होणार आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे अपार संपत्ती देखील मिळू शकते.
( टीप– वरील माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती वाचकांसाठी माहितीस्तव सादर केलेली आहे. या माहितीचे अहमदनगर लाईव्ह 24 कुठल्याही प्रकारचे समर्थन किंवा दावा करत नाही.)