Samudra Shastra : अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणेच सामुद्रिक शास्त्र देखील व्यक्तीच्या भूत, भविष्य आणि वर्तमानाची माहिती देते. अंकशास्त्रात अंकांना विशेष महत्त्व असते आणि सामुद्रिक शास्त्रात व्यक्तीच्या हालचाली त्याची शारीरिक जडणघडण या साऱ्या गोष्टींना महत्त्व असते.
सामुद्रिक शास्त्रात व्यक्तीची शारीरिक जडणघडण कशी आहे यावरूनच त्या व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि त्याचे भविष्य याचा अंदाज बांधला जातो. असं म्हणतात की व्यक्तीच्या दातांवरूनही त्याचे भविष्य समजत असते. सामुद्रिक शास्त्र सांगते की ज्या लोकांच्या दातांमध्ये गॅप असतो म्हणजेच दातांमध्ये फट असणारे लोक फारच भाग्यशाली असतात.
दरम्यान आज आपण दातांमध्ये फट असणाऱ्या लोकांच्या स्वभावाची आणि व्यक्तिमत्त्वाची माहिती पाहणार आहोत. या लोकांबाबत सामुद्रिक शास्त्रात नेमके काय लिहिले गेले आहे हे आज आपण थोडक्यात समजून घेणार आहोत.
दातात फट असणाऱ्या लोकांचा स्वभाव अन व्यक्तिमत्व कसे असते?
सामुद्रिक शास्त्रानुसार, असे लोक खूप भाग्यवान असतात. त्यांना प्रत्येक कामात यश मिळतं. हे लोक ज्या कामाला हात लावतात ते काम पूर्ण करतातचं. हे लोक भाग्यशाली तर असतातच सोबतच अगदीच प्रतिभावानं लोकांमध्ये या लोकांची गणना होते.
कोणतेही क्षेत्र असो त्या क्षेत्रात हे लोक आपल्या प्रतिभेने लोकांना आश्चर्यचकित करतात आणि घवघवीत यश मिळवतात. सरळ स्वभावाची ही लोक दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाहीत. हाच त्यांचा स्वभाव त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतो.
नशीबवान, प्रतिभावान, सरळ स्वभाव आणि अपार कष्ट करण्याची ताकद ही या लोकांची काही ठळक वैशिष्ट्ये. हे लोक मेहनतीवर अधिक विश्वास ठेवतात आणि आत्मनिर्भर आयुष्य जगतात.
जीवनात कितीही संकटे आलीत तरीही ही लोक खचत नाहीत आणि धैर्याने आव्हानांचा सामना करतात. अफाट बुद्धिमत्तेचे धनी म्हणून या लोकांची ओळख. ही लोक नेहमी उत्साही असतात आणि उत्साहाने आपल्या क्षेत्रातील कामे पार पाडतात.
निस्वार्थी स्वभाव असल्याने आपला फायदा किंवा तोटा न पाहता ही लोक इतरांची मदत करतात. या लोकांचा स्वभाव पाहून अनेक जण या लोकांसोबत मैत्री करतात. हे लोक लवकर मित्र बनवतात आणि आपली मैत्री टिकवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतात.