स्पेशल

Samudrik Shastra: तुमच्या शरीराच्या ‘या’ भागांवर असेल तीळ तर जीवनात मिळेल पैसा व संपत्ती! वाचा माहिती

Published by
Ahmednagarlive24 Office

Samudrik Shastra:- ज्योतिष शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे ग्रहांचा व त्यांच्या गोचर किंवा इतर हालचालींचा जो काही राशींवर परिणाम होत असतो त्याचा अभ्यास ज्योतिष शास्त्रामध्ये केला जातो. भारतामध्ये आजही ज्योतिषशास्त्राला खूप महत्त्व असून अनेक शुभ गोष्टींची सुरुवात करण्याअगोदर मुहूर्त पाहण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा आधार घेतला जातो.

अगदी त्याचप्रमाणे अंकशास्त्र देखील तितकेच महत्त्वाचे आहे. व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा मुलांक काढला जातो व त्या मुलांकावरून संबंधित व्यक्तीचे जीवन कसे राहील याबाबतचे भविष्य सांगितले जाते. याचप्रमाणे समुद्र शास्त्राला देखील महत्त्व असून या माध्यमातून देखील व्यक्तीचे भविष्य किंवा व्यक्तीचे पुढील आयुष्य कसे राहील याबाबत आडाखे बांधले जातात.

समुद्र शास्त्रानुसार बघितले तर शरीराच्या काही भागांवर तीळ असणे हे भाग्याचे तसेच जीवनामध्ये पैसा व संपत्ती मिळण्याचे लक्षण समजले जाते. शरीराच्या कोणत्या भागावर तीळ हे समुद्र शास्त्रानुसार भाग्यवान मानले जाते हे माहिती असणे देखील तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे या लेखात आपण याबद्दलची माहिती घेऊ.

शरीराच्या या भागावर तीळ असणे आयुष्यासाठी असते महत्त्वाचे

1- उजव्या गालावर तीळ असणे- जर व्यक्तीच्या उजव्या गालावर तीळ असेल तर ते भाग्यवान असल्याचे लक्षण असते. हे लोक फार कमी कष्ट करून देखील मोठे यश मिळवू शकतात. साधारणपणे जेव्हा ते वयाची 35 शी पर्यंत येतात तेव्हा त्यांना जीवनामध्ये अनेक पद्धतीचा आनंद अनुभवायला मिळतो.

2- तळहाताच्या मध्यभागी तीळ असणे- ज्या व्यक्तीच्या तळहाताच्या मध्यभागी तीळ असेल त्यांना जीवनामध्ये यश हे जरूर मिळते. समजा मूठ बंद करताना तळहातावर तीळ दिसला तर असे लोक आयुष्यभर भरपूर पैसा कमवतात.

3- नाकावर तीळ असणे- ज्या व्यक्तीच्या नाकावर तीळ असते ते लोक हे भाग्यवान असतात व अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्व सुख सुविधा प्राप्त होतात.

4- कमरेवर तीळ असणे- जर व्यक्तीच्या कमरेवर तीळ असेल तरीदेखील ते शुभ लक्षण समजले जाते. विशेषतः एखाद्या महिलेच्या डाव्या कंबरेवर तीळ असेल तर ती खूप श्रीमंत तर असतेच पण तिचे व्यक्तिमत्व देखील खूप अट्रॅक्टीव असते. त्या तुलनेत पुरुषांच्या उजव्या कंबरेवर तीळ भाग्यवान समजली जाते.

5- अंगठ्यावर तीळ असणे- जर एखाद्या व्यक्तीच्या अंगठ्यावरती तीळ असेल तर ते सौभाग्याचे सुचक म्हणून समजले जाते व अंगठ्याच्या मध्यभागी तीळ असेल तर ते जीवनात यश मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचे असते.

6- कपाळाच्या मध्यभागी तीळ असणे- समजा कपाळाच्या मध्यभागी जर असेल तीळ असेल तर ते व्यक्तीच्या यशाचे एक सूचक लक्षण असते. अशा लोकांचे नशीब वयाच्या 35 वर्षानंतर खूप चमकते त्यांना जीवनात खूप मोठा आदर व मानसन्मान देखील मिळतो.

Ahmednagarlive24 Office