संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यात नेमक काय बिनसलं ? कां सुरु आहे दोघांमध्ये भांडण ? वाचा सविस्तर

Tejas B Shelar
Published:

Sandeep Maheshwari Vs Vivek Bindra : जर तुम्ही ही सोशल मीडियाचा वापर करत असाल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबचा उपयोग करत असाल तर तुम्ही संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यातील भांडणाबाबत नक्कीच ऐकल असेल. पण, अनेकांना प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी आणि बडा बिजनेसचे फाउंडर विवेक बिंद्रा यांच्यात नेमकं हे भांडण कशावरून सुरू आहे ? याबाबत माहिती नाही.

यामुळे आज आपण या दोघांमध्ये नेमके कशावरून भांडण सुरु आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरंतर प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर आणि एक लोकप्रिय युट्युबर संदीप माहेश्वरी यांनी 11 डिसेंबरला एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यांनी आपल्या यूट्यूब चैनल वर बिग स्कॅम एक्सपोज या हेडिंगचा एक व्हिडिओ पब्लिश केला.

यामध्ये त्यांनी एका स्कॅमचा उल्लेख केला होता. या व्हिडिओत तीन मुलांसोबत संदीप माहेश्वरी यांनी संवाद साधला असल्याचे दिसते. यात त्या तिन्ही मुलांनी एका प्रसिद्ध youtuber ने त्यांची फसवणूक केला असल्याचा दावा केला आहे. या 10 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये त्या तीन मुलांनी आपापले अनुभव शेअर केले आहेत.

यात त्यांनी सांगितले की, त्यांनी एका लोकप्रिय यूट्यूबरकडून 50,000 रुपयांमध्ये बिझनेस कोर्स खरेदी केला होता. मग त्यांनी या कोर्सची रचना आणि इतर माहिती दिली, तेव्हा माहेश्वरी यांनी हा तर मोठा स्कॅम म्हणजे ‘घोटाळा’ असल्याचे म्हटले. पुढे मुलांनी असा दावा केला की जेव्हा त्यांनी कोर्सची रक्कम परत मागितली तेव्हा त्यांना कोणतेही रिफंड पॉलिसी नसल्याचे सांगितले गेले.

तसेच जर पैसे परत हवे असतील, तर ते कोर्स दुसऱ्याला विकू शकतात आणि त्यांचे पैसे कमिशनच्या स्वरूपात परत मिळवू शकतात, असे त्या मुलांना सांगितले गेले. पण या संपूर्ण व्हिडिओमध्ये मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रा किंवा त्यांच्या कंपनी बडा बिझनेसचा उल्लेख नव्हता.

मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच या व्हिडिओमध्ये ज्या घोटाळ्याचा उल्लेख करण्यात आला आहे तो बिझनेस विवेक बिंद्रा यांचा आहे अशा चर्चा सुरू झाल्यात. सोशल मीडियामध्ये हा व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर दबक्या आवाजात का होईना पण माहेश्वरी यांनी बिंद्रा यांच्या बिजनेस बाबतच हा मोठा आरोप लगावला असल्याच्या चर्चा सुरू झाली.

मग काय यानंतर बडा बिजनेसचे फाउंडर विवेक बिंद्रा यांनी युट्युबवर एक पोस्ट लिहली. बिंद्राने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “संदीप भाई, मी तुमचा नवीन व्हिडिओ “बिग स्कॅम एक्सपोज” पाहिला आहे कारण तुम्ही पुष्टी केली आहे की तो माझ्या आणि माझ्या कंपनीशी संबंधित आहे, त्यामुळे मला वाटते की मी माझ्या अधिकृत आयडीचा वापर करून याबाबत भूमिका स्पष्ट केली पाहिजे.

श्रोत्यांच्या मनात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून खुली चर्चा व्हायला हवी.” ते पुढे म्हणालेत की, “तुम्ही मला तुमच्या शोमध्ये आमंत्रित केले होते, जिथे मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे पूर्ण प्रामाणिकपणे उत्तर दिले. मला तितक्याच प्रामाणिकपणे सांगायचे आहे की जर प्रेक्षकांना माझ्याबद्दल काही प्रश्न असतील तर मी तुमच्या शोमध्ये पुन्हा येईन. मी यावर उघडपणे चर्चा करण्यास तयार आहे. मी तुम्हाला एक खुले आव्हान देतो. तुमच्यात वास्तवाला सामोरे जाण्याची हिंमत आहे का ?”

यानंतर मग पुन्हा माहेश्वरी यांनी युट्युबवर पोस्ट लिहिली. यात त्यांनी असे म्हटले की, “प्रिय विवेक, एकीकडे तू माझ्या टीमला कायदेशीर कारवाईची धमकी दिलीस आणि दुसरीकडे तू तुझ्या स्टाफला माझ्या घरी पाठवलेस. मला तुमच्या धमक्यांची भीती वाटते का ?” ते पुढे म्हणाले की, “फक्त तेच लोक घाबरतात जे काही चुकीचे करतात. मी माझ्यासाठी नाही तर सर्वांच्या कल्याणासाठी काम करतो. आणि मी मरेपर्यंत हेच करत राहीन. तुमच्यासारखे लाखो लोक आले तरी मला हे काम करण्यापासून थांबवू शकणार नाहीत.” यानंतर बिंद्रा यांनी पुन्हा एक व्हिडिओ पब्लिश केला.

मग पुन्हा यावर उत्तर देण्यासाठी माहेश्वरी यांनी 21 डिसेंबरला एक व्हिडिओ पब्लिश केला. #StopVivekBindra या हॅशटॅग सह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. यात माहेश्वरी यांनी विवेक बिंद्रा यांचा बिजनेस कसा एक घोटाळा आहे याबाबत सांगितले आहे. तसेच माहेश्वरी यांनी या प्रकरणांमध्ये आता ते कायदेशीर लढाई करणार असे संकेतही दिले आहेत.

विशेष म्हणजे यासाठी त्यांनी त्यांच्या चॅनलवर मॉनिटायझेशन देखील सुरू केले आहे. आतापर्यंत त्यांच्या चॅनलवर मॉनिटायझेशन सुरू नव्हते. म्हणजेच त्यांना युट्युब मधून कोणतीच इन्कम होत नव्हती. आता मात्र त्यांनी या कायदेशीर कारवाईसाठी पैशांची कमतरता भासू नये यासाठी मॉनिटायझेशन चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण नेमके कोणते वळण घेणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe