Satara News : सध्या राज्यासह संपूर्ण देशभरात वेगवेगळे रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतमाला परियोजने अंतर्गत ग्रीन फील्ड कॉरिडॉर विकसित केले जात आहेत. यामध्ये महाराष्ट्रातही अनेक ग्रीनफिल्ड महामार्गांची कामे प्रस्तावित आहेत. काही महामार्गांचे प्रत्यक्षात कामे देखील सुरू झाली आहेत. अशातच आता सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यासाठी एक अति महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे.
खरं पाहता सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातील हजारो प्रवासी मुंबईला रोजाना प्रवास करत असतात. मात्र मुंबईकडे जाताना या प्रवाशांना वाहतूककोंडीचा मोठा सामना करावा लागतो. विशेषता पुणे आणि पनवेल मध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी होते आणि याचा फटका प्रवाशांना बसतो. या ट्रॅफिकच्या समस्येमुळे जवळपास दोन तास प्रवास उशिरा प्रवाशांचा होतो. परिणामी आता यावर उपाययोजना म्हणून एक नवीन ग्रीन फील्ड महामार्ग तयार केला जावा अशी मागणी करण्यात येत आहे. फलटण- सुरूर- वाई- महाडवरून मुंबई- गोवा महामार्गमार्गे मुंबई जेएनपीटी असा ग्रीन फिल्ड हायवे बनवला जावा अशी मागणी असून यामुळे सातारा ते मुंबई दरम्यानच्या प्रवासात दोन तासांची बचत होणार आहे. याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांनाही होणार आहे.
हे पण वाचा :- महाराष्ट्रासाठी चिंताजनक! आणखी ‘इतके’ दिवस कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा गंभीर इशारा
हा महामार्ग साताऱ्यातील उद्योग, कृषी, शैक्षणिक क्षेत्रासाठी फायदेशीर ठरणार असून यामुळे आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळणार असल्याचा दावा केला जात असून हा महामार्ग मार्गी लावावा अशी आशा आता जिल्हाभरातून व्यक्त केली जात आहे. याबाबत फलटण, सातारा, कोरेगाव, वाई आदी भागांतील लोकांनी एकत्र येऊन केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे. दरम्यान यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी सकारात्मक असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये केला जात आहे.
हे पण वाचा :- पंजाबरावांचा एप्रिल महिन्यातील हवामान अंदाज; ‘हे’ सहा दिवस पडणार मुसळधार पाऊस !
यामुळे जर खरच फलटण- वाठार स्टेशन- सुरूर- वाई- धोम धरणमार्गे- ढवळे- महाड- दिघी पोर्ट- जेएनपीटी, मुंबई असा ग्रीन फील्ड महामार्ग तयार झाला तर सातारा जिल्ह्यातून तसेच पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईला प्रवास करणे सोयीचे होईल आणि यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. याबाबत अजून अधिकारीक अशी माहिती हाती आलेली नाही मात्र सातारा जिल्ह्यातून याबाबत पाठपुरावा नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात हा नवीन ग्रीनफिल्ड महामार्ग तयार होऊ शकतो असं सांगितलं जात आहे.
हे पण वाचा :- राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! महागाई भत्ता वाढीचा प्रस्ताव तयार; ‘इतका’ वाढणार DA, पहा पगारात किती वाढ होणार?