Satara News : शेतीमध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. शेती व्यवसाय सर्वस्वी निसर्गावर आधारित असल्याने नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित अशी कमाई करता येत नाही. निश्चितच ही एक खरी बाब असली तरी देखील या संकटावर मात करत काही शेतकऱ्यांनी शेती मधून लाखोंची कमाई करण्याची किमया साधली आहे.
यासाठी या शेतकऱ्यांनी शेतीमध्ये काही बदल केले आहेत. प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीक पद्धतीत बदल केला जात आहे. बाजारपेठेत ज्या पिकाला मागणी आहे अशा पिकांची शेती आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे. म्हणजेच बाजारात जे विकेल तेच पिकेल या तंत्राचा वापर बळीराजा करत आहे.
हे पण वाचा :- शिंदे सरकारच कर्मचाऱ्यांना गिफ्ट ! जुनी पेन्शन योजनेबाबत घेतला ‘हा’ निर्णय, पहा…..
विशेष बाब म्हणजे या तंत्राचा आणि त्याला देण्यात आलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आता शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने देखील शेतीमध्ये असाच एक नवीन प्रयोग केला आहे. पाटण तालुक्याच्या मौजे राहूडे या गावातील प्रयोगशील शेतकरी सुहास माने यांनी पीक पद्धतीत बदल करत कलिंगड या हंगामी पिकाच्या शेतीतून साडेतीन एकरात लाखों रुपयांची कमाई करून दाखवली आहे.
त्यांनी अवघ्या दोन महिन्यात म्हणजेच 60 दिवसात कलिंगडच्या पिकातून एकरी तीन लाखांची कमाई केली आहे. त्यामुळे सध्या माने यांची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सुहास माने हे गावचे माजी सरपंच असून त्यांनी पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून काही काम पाहिले आहे. निश्चितच, राजकारण आणि शेतीमध्ये देखील सुहास माने यांनी प्रयोगशीलता जपली आहे. हेच कारण आहे की राजकारणाप्रमाणेच शेतीमध्ये देखील त्यांना चांगली प्रगती साधता आली आहे.
हे पण वाचा :- कांदा विक्रीची पट्टी आहे, पण सातबाऱ्यावर पिकाची नोंद नाही तरी मिळणार का कांदा अनुदान? महसूल मंत्री विखे पाटील यांच स्पष्टीकरण
माने यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांनी तीन जातीच्या कलिंगडाची लागवड केली. आरोही, सरस्वती व मेलोडी या तीन जातीच्या कलिंगड रोपांची त्यांनी लागवड केली. माने यांनी लागवड केलेले कलिंगड बाहेरून सामान्य कलिंगडाप्रमाणे भासत असले तरी देखील आतून पिवळ्या रंगाचे आहे. यामुळे या कलिंगडाला इतर कलिंगडाच्या तुलनेत बाजारात मागणी आहे. हेच कारण आहे की रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून माने यांचे कलिंगड 27 रुपये प्रति किलो या दराने खरेदी झाली आहे.
यासाठी त्यांना एकरी 70 हजार रुपये इतका खर्च आला असून एकरी 3 लाखाची कमाई झाली आहे. म्हणजेच खर्च वजा जाता साडेतीन एकरातून पाच ते सहा लाखांची कमाई त्यांना होणार आहे. निश्चितच माने यांचा हा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक राहणार असून सध्या माने यांच्या बांधावर इतर प्रयोगशील शेतकरी त्यांचा कलिंगड प्लॉट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी बातमी कामाची; वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागणार