स्पेशल

शिंदे सरकारचं राज्य कर्मचाऱ्यांना मकरसंक्रांतीचं गिफ्ट ! 4% महागाई भत्ता वाढ लागू ; आता मिळणार 38% DA, ‘इतकं’ वाढणार वेतन, पहा डिटेल्स

Published by
Ajay Patil

Satva Vetan Aayog  : महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी काल शिंदे सरकारकडून दोन अति महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. यामध्ये पहिला निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, तर दुसरा निर्णय हा महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने घेतला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत के पी बक्षी समितीच्या शिफारशी राज्य कर्मचाऱ्यांसाठी अति महत्वाच्या स्वीकृत करण्यात आल्या.

यामुळे राज्य शासन सेवेत कार्यरत असलेल्या समकक्ष कर्मचाऱ्यांच्या वेतनात जी काही तफावत होती ती तफावत दूर होण्यास मदत होणार आहे. म्हणजेच समकक्ष राज्य कर्मचाऱ्यांना आता समान काम, समान अधिकार आणि समान वेतन मिळणार आहे.

बक्षी समितीच्या शिफारशी राज्य शासनाने स्वीकृत केल्यानंतर राज्य शासनाच्या तिजोरीवर वार्षिक 240 कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. मात्र यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

डीए वाढीचा शासन निर्णय 

याशिवाय काल महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने राज्य कर्मचाऱ्यांना 4% महागाई भत्ता वाढीचा लाभ देखील अनुज्ञेय केला आहे. म्हणजे आता कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता लागू झाला आहे. हा महागाई भत्ता वाढीचा लाभ जुलै महिन्यापासून लागू झाला असून जुलै ते डिसेंबर दरम्यानची महागाई भत्ता थकबाकी म्हणजे डीए ऍरियर जानेवारी महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे. दरम्यान आज आपण महागाई भत्ता वाढीचा लाभ अनुज्ञय झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात किती वाढ होणार आहे या महत्त्वपूर्ण माहिती विषयी जाणून घेणार आहोत.

इतकं वाढणार वेतन 

समजा एखाद्याचे मूळ वेतन हे १८,००० आहे. त्याला ३४% महागाई भत्त्यानुसार ६१२० प्रति महिना मिळत होता. आता डीए वाढला आहे मग ३८% डीए नुसार ही रक्कम ६८४० प्रति महिना होईल. म्हणजे संबंधित व्यक्तीच्या पगारात ७२० रुपये वाढणार आहेत. म्हणजे ८६४० रुपये वार्षिक पगार वाढ ही मिळणार आहे. निश्चितच 4% डीए वाढ दिल्यामुळे महागाईच्या या काळात राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil